Homeकल्चर +बिग बॉसच्या घरात...

बिग बॉसच्या घरात आज “फळ की निष्फळ”!

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल पार पडलेल्या दुसर्‍या उपकार्यात टीम ए विजयी ठरली. आणि त्यामुळेच टीम बीला बिग बॉसच्या पुढील आदेशापर्यंत घरातील फर्निचर वापरता येणार नाही.

काल साप्ताहिक कार्यात पणाला लागले बाथरूम. आज बघूया कोण या उपकार्यामध्ये विजयी ठरेल. याचसोबत बिग बॉस मराठीच्या घरात आज अजून एक उपकार्य रंगणार आहे “फळ की निष्फळ”.. यामध्ये पणाला लागणार आहेत घरामधील फळं. या उपकार्यातील विजयी टीममधील सदस्यांना घरातील फळं खाण्याची परवानगी असेल. बघूया या कार्यात कोण बाजी मारणार?

आज विशाल विकासची माफी मागणार आहे. विशाल विकासला टास्कमध्ये काहीतरी बोलून गेला असावा. त्यामुळे विकासला विशाल आपल्या मनातील गोष्ट सांगणार आहे. विशाल म्हणाला, “टास्क संपला भावा, टास्कचा विषय तिथेच सोड. तुला माहिती आहे मी कसा खेळतो आणि मला माहिती आहे तू कसं खेळतोस. हा गेम इथे संपला, विषय इथे सुटला. आणि शेवटी दरवाजा बंद करून आपल्याला जायचं आहे हे लक्षात ठेव. आणि जे काही मी तुला रागाने बोललो असेल मला बोलण्याची इच्छा नव्हती. मी माफी मागतो. हा गेम आहे. तू खूप भारी खेळतोस. तू इन्सपिरेशन आहेस माझं आणि मनात काही राग ठेऊ नकोस”.

असं काय घडलं खेळात की विशालने विकासची माफी मागितली? काय बोलून गेला विशाल, ज्याचं विकासला इतकं वाईट वाटलं? विकास विशालला माफ करेल? कोणती टीम जिंकेल आजची उपकार्ये?

बिग बॉसच्या घरातील सदस्यांमध्ये कुठल्या ना कुठल्या कारणामुळे वादविवाद होताना दिसत असतात. हे सदस्य कधीकधी भांडणं, मतभेद विसरून एकमेकांना साथ देतानादेखील दिसतात. बिग बॉसचं घर प्रत्येक सदस्याला त्याची नव्याने ओळख करून देतं असं म्हणायला हरकत नाही. बिग बॉस जेव्हा सदस्यांना एखादा टास्क देतो तेव्हा त्या टास्कचा एक संचालकदेखील नेमून देतो. कधी हा संचालक fair आहे असं म्हणतात, तर कधी unfair आहे असं म्हणतात.

आजच्या भागात विकास अक्षयवर थोडा नाराज दिसणार आहे. आज होणार्‍या टास्कचा अक्षय संचालक आहे. अक्षयने असा कोणता निर्णय घेतला, ज्यामुळे विकास त्याच्यावर इतका नाराज झाला आहे. कळेलच आजच्या भागामध्ये.

विकास आणि मीनलमध्ये आजच्या भागात या विषयावर चर्चा होणार आहे. मीनल विकासला सांगणार आहे, “तू कितीही जीव तोड, काहीपण कर unfair होणार आहे. काही फायदा नाहीये, यांच्यावर एनर्जी घालवून. तू तुझा मुद्दा मांड जो आहे, शेवटी तेच होणार आहे जे त्यांना हवं आहे. त्यामुळे स्वत:ला त्रास करून नको घेऊस.

विकास म्हणाला, “अक्षय काय कामाचा आहे. कशाला त्याला संचालक केलं आहे. आपण fair खेळू आणि हरू”.

नक्की मीनल आणि विकास काय बोलत आहेत? कळेल आजच्या भागात. तेव्हा बघा बिग बॉस मराठी. रात्री, कलर्स मराठीवर.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content