Homeकल्चर +बिग बॉसच्या घरात...

बिग बॉसच्या घरात आज रंगणार ‘माझे मडके भरी’!

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल काही आगळवेगळं घडलं. चक्क बिग बॉसने त्यांचाच फोन घरामध्ये ठेवला आणि म्हणूनच या आठवड्याची थीम असणार आहे “टेलिफोन”.

जेव्हा जेव्हा या टेलिफोनची रिंग वाजेल तेव्हा घरातील सदस्यांना नवनवीन आव्हानांना सामोरं जावं लागणार आहे, असे बिग बॉसने कालच्या भागामध्ये घोषित केले आहे. काल घरामध्ये रंगले “चार्ज करायचा नाय” हे नॉमिनेशन कार्य, ज्यामध्ये अक्षय वाघमारे, सुरेखा कुडची, विशाल निकम, स्नेहा वाघ, संतोष चौधरी (दादुस), तृप्ती देसाई हे सदस्य घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये  नॉमिनेट झाले.

आज घरामध्ये रंगणार आहे “माझे मडके भरी” हे उपकार्य. घरातल्या भांड्यांची सुविधा जिंकण्यासाठी हे कार्य सोपवण्यात आले आहे. टीम ए आणि टीम बीमध्ये ही बाजी कोण मारणार? काय काय राडे होणार? कोणत्या टीमची मडकी फोडली जाणार? कोण कोणाशी पंगा घेणार? हे कळेल आजच्या भागात.

बिग बॉसच्या घरात आज सेलिब्रिशेनचा मूड दिसणार आहे. कारणही खास आहे. काल ४ ऑक्टोबरला घरातली सदस्य स्नेहा वाघचा जन्मदिवस. आणि त्याचनिमित्ताने सगळ्या सदस्यांनी तिचा वाढदिवस एकत्र येऊन साजरा केला. तृप्ती देसाई यांनी सगळ्यांच्यावतीने तिला छानसं गिफ्टही दिलं.

बिग बॉसच्या घरामध्ये सणासुदीच्या दिवशी, कोणाचा वाढदिवस असेल तर गोडधोड पदार्थ खाण्याची संधी सदस्यांना मिळते आणि त्याचा आनंद या सदस्यांच्या चेहर्‍यावर दिसून येतो. अजून काय काय धम्मालमस्ती केली गेली हे बघा आजच्या भागात, रात्री कलर्स मराठीवर!

Continue reading

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या सभागृहात तबला वादन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन वयोगटात घेतली जाईल. (छोटा वयोगट १० ते १५ वर्षे आणि मोठा वयोगट १६ ते २५...

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...
Skip to content