Homeकल्चर +शिवलीला तर गेली,...

शिवलीला तर गेली, पण बरंच काही शिकवून!

बिग बॉस मराठीच्या घरातल्या सदस्यांना काल खूप मोठा धक्का बसला जेव्हा शिवलीलाने प्रकृती खालावल्याने घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. विशाल निकम, सोनाली पाटील, मीनल शाह यांना अश्रू अनावर झाले. कालच्या या तिच्या निर्णयानंतर विशाल आणि इतर सदस्य आज त्यांची मते मांडताना दिसणार आहेत.

दोन दिवस रंगलेल्या बिग बॉसच्या चावडीमध्ये काहींची कानउघडणी झाली, काहींना महेश मांजरेकर यांनी समजावून सांगितले आणि काही सदस्यांना ते कसे आणि कुठे चुकले हेदेखील दाखवून दिले. वूटद्वारे आलेल्या काही अतरंगी डिमांडसाठी जय आणि विशाल राजी झाले आणि जयने त्यामध्ये बाजी मारली.

चुगली बूथद्वारे जयच्या फॅनने त्याला चुगली केली आणि विकास – विशाल काय म्हणाले हे उघड केले. बघूया, या नव्या आठवड्यात कोण कोणाला भिडणार? कोणते नवे टास्क रंगणार? कोण बाजी मारणार? कोणाला मिळणार कॅप्टन बनण्याचा बहुमान?

शिवलीलाच्या निर्णयामुळे विशाल अत्यंत भावुक झाला. तो त्याच्या भावना सोनाली, मीनलला सांगताना दिसणार आहे. विशाल म्हणतोय, “ती असायला हवी होती. खूप काही शिकवून गेली. तिने आपल्यावर जो विश्वास दाखवला तो कधी नाही मोडणार. काही माणसं दोन दिवस आयुष्यात येतात आणि आयुष्यभराची जागा करून जातात, त्यातली ती आहे”..

मीनलनेही सांगितले, “ती कशी होती आपल्यालाच माहिती आहे.. तिच्यासारखी मुलगी मी नाही बघितली कधीच. तिला इतकं नॉलेज आहे.. त्याच्यासमोर कोणीच काही नाही.

बिग बॉसच्या घरात आज एक घोषणा होतेय. त्यामुळे सदस्यांचा आनंद गगनात मावेनासा होतोय. ती घोषणा म्हणजे “बिग बॉस आपणा सर्वांना आपले फोन्स परत देत आहेत”.

बिग बॉसच्या घरात येताना सदस्यांना बर्‍याच गोष्टी बाहेरच सोडून याव्या लागतात. त्यातली एक गोष्ट म्हणजे फोन्स. आणि आज बिग बॉस तेच सदस्यांना परत करणार असे सांगणार आहेत. स्पर्धकांना त्यांचे फोन्स परत मिळणार? पुढे काय काय होणार हे तर आजच्या भागामध्ये कळेलच.

नुकत्याच बाहेर आलेल्या प्रोमोमध्ये घरात एक फोन दिसत आहे. म्हणजेच आज घरामध्ये एक फोन पाठवण्यात येणार आहे. त्या फोनची रिंग वाजते आणि घरामध्ये एकच आवाज घुमतो “फोन आला, फोन आला”. आणि त्यातून बिग बॉस यांचा आवाज येतो, ज्यामध्ये त्यांनी ते घोषित करतात की, सदस्यांना त्यांचे फोन्स परत देणार.

फोन जयने घेतला होता. जयने हे सांगताच सदस्यांचा काही विश्वास त्यावर बसेना. बघूया काय होतं पुढे..

आज सुरेखाताई, गायत्री, मीनल, मीरा आणि दादुस या सदस्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगताना दिसणार आहे. ज्यामध्ये सुरेखाताई दादुस यांना सांगताना दिसणार आहे, “आम्ही शूटिंगमध्ये जेव्हा कानाखाली लावतोना तेव्हा कसं असतं माहिती”? आणि मग त्यांची मज्जा-मस्ती सुरू होते.

पण हे करून दाखवताना दादुसना खरोखरच चुकून फटका बसणार आहे. पुढे अजून घरामध्ये काय होत हे जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी, आज रात्री कलर्स मराठीवर!

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content