Homeकल्चर +अलका देव मारूलकर...

अलका देव मारूलकर यांचे गायन १० ऑक्टोबरला!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने स्वरसंचित, ह्या कार्यक्रमात ग्वाल्हेर, किराणा, आणि आग्रा घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका, विदुषी अलका देव मारुलकर यांच्या गायनाचे ध्वनिमुद्रण प्रसारित करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम रविवार, दिनांक १० ऑक्टोबर २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजता होईल.

विदुषी अलका देव मारुलकर यांनी संगीताचे शिक्षण त्यांचे वडील पं. राजाभाऊ देव व पं. मधुसूदन कानिटकर यांच्याकडून घेतले. त्यांनी शास्त्रीय संगीतावर विपुल लेखन केले असून नवीन रागांची निर्मिती केली आहे. ठुमरी, कजरी, होरी अशा संगीताच्या उपशास्त्रीय प्रकारांवर त्यांचे प्रभुत्व आहे.

ह्या कार्यक्रमाची लिंक आपल्याला संस्थेच्या www.dadarmatungaculturalcentre.org या संकेतस्थळावर कार्यक्रमाच्या एक दिवस आधी उपलब्ध होईल.  अधिक माहितीसाठी संस्थेच्या कार्यालयाशी संपर्क करावा.

Continue reading

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या सभागृहात तबला वादन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन वयोगटात घेतली जाईल. (छोटा वयोगट १० ते १५ वर्षे आणि मोठा वयोगट १६ ते २५...

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...
Skip to content