Homeमुंबई स्पेशलकुलाबा-सीप्झ मेट्रोची चाचणी...

कुलाबा-सीप्झ मेट्रोची चाचणी मरोळ-मरोशी येथे!

दक्षिण मुंबईतली वाहतूककोंडी सोडविण्यासाठी महत्त्वाची मेट्रो मार्गिका कुलाबा ते सीप्झसाठीच्या मेट्रो रेल्वेच्या डब्यांची चाचणी मरोळ-मरोशी येथे करण्यात येणार आहे.

आरेतल्या राज्य शासनाने स्थगिती दिलेल्या जागेच्या हद्दीबाहेरच ही चाचणी करण्यात येणार असून आरेतील एकाही वृक्षाला धक्का न लागू देता मेट्रोच्या चाचण्या पूर्ण करण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

सध्या मरोळ-मरोशी या रस्त्याच्या भुयारी मार्गाचे काम चालू असून या कामाच्या जवळच रॅम्प बनवून काम हाती घेण्यात येणार आहे. मुंबईतली वाहतूककोंडी दूर करण्यासाठी व प्रदूषण कमी करण्यासाठी कुलाबा ते सीप्झ या मार्गावर मेट्रो लाईन-3चे काम प्रगतीपथावर आहे.

या मार्गिकेकरिता अल्स्टॉम या कंपनीने श्रीसिटी आंध्र प्रदेश येथे 8 डब्यांची ट्रेन तयार केलेली आहे. या गाडीची त्याठिकाणी तांत्रिक चाचणी झालेली आहे. आता प्रत्यक्षात याची चाचणी मुंबईत 10 हजार किमी चालवून घेण्यात येणार आहे. त्यानंतर कुलाबा ते सीप्झ या मार्गिकेवरदेखील ट्रेन चालविण्यात येणार आहे. या चाचण्या यशस्वी झाल्यानंतर अशा पद्धतीच्या 31 ट्रेन या मार्गावर धावण्याकरिता उपलब्ध होणार आहेत.

Continue reading

संपात उतरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई!

विविध प्रलंबित मागण्यांसाठी उद्या म्हणजेच २१ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारण्याबाबत राज्य सरकारी, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी शासनास नोटीस दिली असून, या पार्श्वभूमीवर या संपामध्ये सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा शासनाने दिला आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, राज्य सरकारी गट‑ड (चतुर्थ श्रेणी)...

२४ एप्रिलपर्यंत राज्यात वादळी पाऊस, गारपीट व विजांचा इशारा

भारतीय हवामान खात्याच्या आज जाहीर केलेल्या अंदाजानुसार, राज्यातील विविध भागांत २४ एप्रिलपर्यंत वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातल्या जिल्ह्यांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने केले आहे. या पार्श्वभूमीवर...

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून जर्मनीच्या दौऱ्यावर

इराण आणि अमेरिकेतला संघर्ष तीव्र होत असतानाच तसेच नाटो संघटनेतल्या युरोपीय राष्ट्रांची यावरील भूमिका महत्त्वाची ठरत असतानाच भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून 23 एप्रिलपर्यंत तीन दिवसांच्या जर्मनीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, संरक्षण मंत्री त्यांचे जर्मनीतील समकक्ष बोरिस...
Skip to content