Homeमुंबई स्पेशलआभासी नको, तर...

आभासी नको, तर प्रत्यक्ष बैठका घ्या!

मुंबई महापालिकेतल्या सर्व बैठका यापुढे ऑनलाईन न घेता प्रत्यक्ष स्वरूपात घ्यावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी नुकतीच केली.

मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांच्या झालेल्या ऑनलाईन (आभासी) बैठकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या मुंबईतील सर्व नगरसेवकांनी पालिकाच्या प्रशासनाला कोविड काळापासून सुरू असलेल्या आभासी बैठका बंद करून यापुढे महापालिकेच्या सभागृहात “प्रत्यक्ष” बैठका सुरू कराव्यात असे खडसावून सांगितले. या बैठकीत नगरसेवकांनी तशा आशयाचे फलकही प्रदर्शित केले.

Continue reading

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या सभागृहात तबला वादन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन वयोगटात घेतली जाईल. (छोटा वयोगट १० ते १५ वर्षे आणि मोठा वयोगट १६ ते २५...

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...
Skip to content