Homeमुंबई स्पेशलमंगळवारी सकाळी फक्त...

मंगळवारी सकाळी फक्त विद्यार्थी व शिक्षकांचे लसीकरण!

कोविड १९ प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत, मुंबई महापालिकेच्या वतीने मुंबईतील सर्व शासकीय आणि पालिका कोविड १९ लसीकरण केंद्रांवर, सोमवारी, २७ सप्टेंबरला सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत, फक्त महिलांसाठी राखीव लसीकरण सत्र राबवले जाणार आहे. तसेच, मंगळवारी, २८ सप्टेंबरला सकाळी ९ ते दुपारी २ या पहिल्या सत्रात, शिक्षक तसेच १८ वर्षे व त्यावरील वयाचे विद्यार्थी यांचे कोविड लसीकरण होईल. याचदिवशी दुसऱ्या सत्रात म्हणजे दुपारी ३ ते रात्री ८ या वेळेत, दुसरी मात्रा (डोस) देय असणाऱ्या नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. या दुपारच्या सत्रात कोणालाही कोविड लसीचा पहिला डोस दिला जाणार नाही, असे मुंबई महापालिकेने जाहीर केले आहे.

महिला तसेच शिक्षक व विद्यार्थी यांना पहिली किंवा पहिली मात्रा घेऊन विहित कालावधी पूर्ण झाला असेल तर (कोविशिल्‍ड संदर्भात पहिल्या डोसनंतर ८४ दिवस आणि कोव्‍हॅक्‍सिन असल्यास पहिल्या डोसनंतर २८ दिवस पूर्ण झाल्‍यास) दुसरी मात्रादेखील घेता येईल. त्याचप्रमाणे, दुसरी मात्रा घेण्यासाठी येणाऱ्यांना, पहिला डोस घेतला असल्याचे प्रमाणपत्रदेखील सोबत आणणे आवश्यक असेल.

या दोन्ही दिवशी, मुंबईतील सर्व शासकीय व महापालिका लसीकरण केद्रांवर थेट येऊन (वॉक इन) संबंधित घटकातील पात्र नागरिकांना लस घेता येईल. त्यासाठी ऑनलाईन पूर्वनोंदणीची आवश्यकता नाही. पात्र लाभार्थ्यांनी येताना, शासकीय ओळखपत्र आणणे आवश्यक असेल. तसेच शिक्षक व विद्यार्थी यांनी शैक्षणिक संस्थांचे ओळखपत्रदेखील सोबत आणणे आवश्यक आहे.

कोविड-१९ विषाणू प्रतिबंधक लसीकरण अधिकाधिक वेगाने आणि सर्व स्तरातील नागरिकांपर्यंत नेण्यासाठी मुंबई महापालिकादेखील प्रयत्नशील आहे. त्यासाठी या विशेष सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. कोविड-१९चा प्रादुर्भाव पुन्हा वाढू नये, यासाठी प्रत्येक नागरिकाने कोविड लसीचे दोन्ही डोस घेऊन लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. सबब, पात्र नागरिकांनी या सत्रांचा जास्‍तीतजास्‍त प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहनही पालिका प्रशासनाने केले आहे.

Continue reading

संपात उतरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई!

विविध प्रलंबित मागण्यांसाठी उद्या म्हणजेच २१ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारण्याबाबत राज्य सरकारी, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी शासनास नोटीस दिली असून, या पार्श्वभूमीवर या संपामध्ये सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा शासनाने दिला आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, राज्य सरकारी गट‑ड (चतुर्थ श्रेणी)...

२४ एप्रिलपर्यंत राज्यात वादळी पाऊस, गारपीट व विजांचा इशारा

भारतीय हवामान खात्याच्या आज जाहीर केलेल्या अंदाजानुसार, राज्यातील विविध भागांत २४ एप्रिलपर्यंत वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातल्या जिल्ह्यांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने केले आहे. या पार्श्वभूमीवर...

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून जर्मनीच्या दौऱ्यावर

इराण आणि अमेरिकेतला संघर्ष तीव्र होत असतानाच तसेच नाटो संघटनेतल्या युरोपीय राष्ट्रांची यावरील भूमिका महत्त्वाची ठरत असतानाच भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून 23 एप्रिलपर्यंत तीन दिवसांच्या जर्मनीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, संरक्षण मंत्री त्यांचे जर्मनीतील समकक्ष बोरिस...
Skip to content