बिग बॉस मराठीच्या घरात सदस्यांना काल मिळालं सिझनमधलं सर्वात मोठं सरप्राईझ.. एका नव्या अध्यायाचा प्रारंभ झाला. बिग बॉसने सदस्यांना दाखविली टेम्पटेशन रूमची पहिली झलक. या रूममध्ये असणार आहेत बरीच सरप्राईझेस आणि आमिषं.. या रूममध्ये असणार आहे एक फोनबूथ.. ज्याद्वारे सदस्य बाहेरच्या जगातील त्यांच्या जवळच्या व्यक्तीशी संपर्क साधू शकतील. तसेच असणार आहेत खाण्याचे विविध पदार्थ, जे बिग बॉसच्या घरात सदस्यांसाठी एरव्ही उपलब्ध नसतात.
बायोस्कोप असणार आहे, ज्यामधून सदस्य घराच्या आत डोकावू शकतील. पॉवर कार्ड तसंच बुक ऑफ टेंपटेशन. आता या दोघांमध्ये काय गुपित दडलेलं आहे, त्यांची काय ताकद आहे ते सदस्यांना त्या रूममध्ये गेल्यावरच कळणार आहे.

बिग बॉस मराठीच्या घरात सुरू असलेल्या साप्ताहिक कार्यातील उपकार्ये काल संपली. उत्कर्ष शिंदे, या पहिल्या साप्ताहिक कार्यातील दोन उपकार्यं जिंकून पहिला विजेता ठरला. उत्कर्षला विशेष अधिकार देण्यात आला, ज्यात त्याला एका महिला सदस्याची सहविजेती म्हणून निवड करायला सांगितली. उत्कर्षने मीरा जगन्नाथची निवड केली. त्यामुळेच मीरा आणि उत्कर्ष शक्तीपदक मिळविण्याच्या उमेदवारीचे मानकरी ठरले.

शक्तीपदक जिंकणारा सदस्य एका नव्या अध्यायाशी जोडला जाणार आहे. आता या दोघांमध्ये हे पदक मिळवण्यासाठी एक सामना रंगणार आहे. हे कार्य फक्त टेंपटेशन रूमसाठी नसून बिग बॉसच्या तिसर्या पर्वातील पहिले कॅप्टनपद मिळवण्याच्या बहुमानासाठीही असणार आहे. जो सदस्य कार्यात विजेता ठरेल, त्या सदस्याला टेंपटेशन रूम आणि कॅप्टनपद यामध्ये निवड करावी लागणार आहे.

कालपासूनच घरामध्ये फाशाचा खेळ सुरू झाला आहे. फाशाच्या खेळात स्पर्धकांमध्ये रंगली आहे जुगलबंदी. कोण या खेळात जिंकणार? कोण तिसर्या पर्वाचा पहिला कॅप्टन होण्याचा बहुमान मिळवणार? कोण टेंपटेशन रूमची निवड करणार?
मीरा आणि जयमध्ये जोरदार भांडण होणार आहे. जय म्हणतोय.. संचालिका जर जुडो-कराटे खेळली तर मी नॅशनल लेव्हल प्लेयर आहे. मी स्विमिंग पूलमध्ये टाकून देईन. विकास त्याला शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहे. बघूया काय होतं? कोण जिंकतं, या टास्कमध्ये?

१५ वेगवेगळ्या स्वभावाचे लोक एकत्र राहणार म्हणजे वादविवाद होणारच, खटके उडणारच.. तसंच काहीसं यावेळेसही बिग बॉस मराठीत दिसून येत आहे. मीरा पहिल्या दिवसापासूनच काहीना काही मुद्द्यांना घेऊन चर्चेत आहे. मग कधी स्नेहासोबत असो तर कधी जयसोबत..
आज वादाची ठिणगी पडणार आहे मीरा आणि आविष्कारमध्ये! मीराला आविष्कार सांगायचा प्रयत्न करतोय.. बाकीच्या सदस्यांनी जसं आवरून ठेवलं आहे, तसं तरी किमान ठेवावं..

पण, तसं करण्यास मीरा साफ नकार देतेय.. हे आतापासून नाही, तर पहिल्या दिवसापासून तसंच आहे असे ती म्हणते. त्यावरून वाद पुढे वाढतो.
आविष्कार म्हणतो, पहिल्या दिवसाचं मला सांगू नकोस.. प्रत्येकजण स्वत:चं काम करतोय.. बाकी साफसफाई करणं माझं काम आहे. तुला मुद्दाम टाकायचं असेल तर मी बघतो काय करायचं ते..

मीरा त्यावर म्हणते, मी तुम्हाला एकच काम सांगतेय, तुम्हाला करायचे असेल तर करा, नसेल जमणार तर नाही म्हणून सांगा. मी तशी तक्रार करेन. मी आताही करणारच आहे तक्रार.
पहिल्या दिवसापासून हे मला त्रास देत आहेत. रोज सकाळी हेच. त्यांनी कालपासून ठरवलं आहे की ते मला नडणार आहेत. जर मी नडायला गेले ना यांना तर मग मी वाट लावेन. मी शांत आहे कारण ते दोन-दोन काम करत आहेत.

दुसर्या दिवशी सांगितलं होतं.. पहिलं बेडरूम करायची आणि मग किचन. मग का नाही ऐकत, मी नाही ना अडून बसले त्यावर, असं मीरा म्हणते.
आता मीरा आणि आविष्कारमधला वाद सुरूच राहतो की तो इथेच थांबतो, हे कळेल आजच्या भागात. बिग बॉस मराठीमध्ये.. आज रात्री कलर्स मराठीवर..

