Homeटॉप स्टोरीमुंबईतल्या सिप्झ प्रकल्पाचा...

मुंबईतल्या सिप्झ प्रकल्पाचा होणार संपूर्ण कायापालट?

केंद्रीय वाणिज्य व उद्योग, मंत्री पियुष गोयल यांनी आज मुंबईतल्या सांताक्रुझ इलेक्ट्रॉनिक्स एक्स्पोर्ट प्रोसेसिंग झोन (सिप्झ) येथील निर्यातदारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना गोयल यांनी सांताक्रुज इलेक्ट्रॉनिक निर्यात प्रोसेसिंग विभाग (सिप्झ) विशेष आर्थिक प्रदेश (सेझ) याच्या संपूर्ण परिसराचा कायापालट करण्याची गरज व्यक्त केली.

1973मध्ये सुरू झालेल्या या प्रकल्पाच्या पायाभूत सुविधा आणि जुन्या इमारतींची अवस्था पाहून मला दुःख होत आहे. सिप्झ हे उद्योगाचे गतिशील ऊर्जाकेंद्र बनू शकते. नवी दिल्लीतील प्रगती मैदानाचादेखील 4000 कोटी रुपये खर्चून कायापालट करण्यात येत आहे. त्या धर्तीवर आपण जागतिक चटईक्षेत्राची संकल्पना इथे राबवू शकतो का? आयटीपीओअर्थात भारत व्यापार प्रोत्साहन संस्था सीप्झमध्ये 30,000 चौरस फुटांचे प्रदर्शन केंद्र उभारू शकते. गरज भासली तर त्याचा खर्च तसेच व्यवस्थापन सीप्झद्वारे केले जाईल, असे ते म्हणाले.

सीप्झ-सेझमधून 30 अब्ज डॉलर्सची निर्यात अपेक्षित आहे. केवळ 50,000 ते 60,000 लोकांना रोजगार देण्यापेक्षा 5 लाख लोकांना सामावून घेण्यासाठी आधुनिक यंत्रसामुग्री गुंतवणूक करण्याचे नियोजन करा, असे गोयल यांनी सांगितले.

आपल्या मालमत्तांची डागडुजी करून त्या नव्या करणाऱ्या उद्योगांना त्या मालमत्तांवरील भाडे आकारणीत 10 वर्षांकरिता सूट देता येईल. अशाप्रकारच्या सार्वजनिक-खाजगी भागीदारीचा यासंदर्भात विचार होऊ शकतो असे ते म्हणाले.

सीप्झ सेझच्या कायापालटाबाबत व्यावहारिक आणि कल्पक तोडग्यासह सूचना करण्याचे आवाहन करताना यापैकी असलेल्या व्यवहार्य प्रस्तावांना सर्वतोपरी सहाय्य करण्याचे आश्वासन गोयल यांनी दिले.

सीप्झ-सेझमध्ये सरकारी विभागाकडून वापरण्यात येणाऱ्या एखाद्या भूभागाचा पुरेसा वापर होत नसल्याचे आढळल्यास ते त्वरित निदर्शनाला आणून द्या. याबरोबरच सरकारी महसूल सुरक्षित राहील आणि औद्योगिक एककांना सुलभ निर्गमन करता येईल यासाठी यंत्रणा निर्माण करण्याचा आपला प्रयत्न आहे. यामुळे बाहेर पडण्याची इच्छा असणाऱ्यांची सोय होण्याबरोबर या हस्तांतर प्रक्रियेचा भाग म्हणून या क्षेत्रात केलेल्या गुंतवणुकीचे त्यांना योग्य मूल्य मिळेल असे धोरण विचाराधीन आहे, असे ते म्हणाले.

800 डॉलर्सपर्यंतच्या कृत्रिम दागिन्यांची ई कॉमर्स मंचावर विनासायास विक्रीची परवानगीविषयी निर्यातदारांनी उपस्थित केलेल्या अनेक मुद्यांचे निरसन उच्च अधिकारप्राप्त समित्यांकडून करण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.

रत्न आणि दागिने क्षेत्रास मार्च 2022पर्यंत कार्यान्वित करण्यासाठी हंगामपूर्व कराराचा भाग म्हणून संयुक्त अरब अमिरातीमध्ये सध्या आकारत असलेल्या शुल्कात 5% सवलत मिळण्याची खात्री करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. जगभरातील खरेदीदार मिळवण्यासाठी आणि सीप्झ विशेष आर्थिक क्षेत्राचे परिवर्तन करण्यासाठी आपल्याकडे एक विलक्षण संधी आहे. वाढीव बदल न करता परिवर्तनशीलता निर्माण करण्यासाठी, विशेष आर्थिक क्षेत्राचा पूर्वीचा जोम आणि उत्साह परत मिळवण्यात मदत करण्यासाठी आपण त्रैमासिक पुनरावलोकन करणार आहोत, असे पियुष गोयल म्हणाले.

आपण यूके, यूएई, ऑस्ट्रेलिया आणि युरोपियन महासंघाबरोबर अधिक मुक्त व्यापार करार करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि तुम्हाला अधिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही यूईए-सीआयएमसह सीप्झ येथील उद्योग एककांशी मुक्त व्यापार कराराबाबत आम्ही अनौपचारिक वाटाघाटी सुरू केल्या आहेत, असे ते म्हणाले.

देशातील सर्व 739 जिल्हे वाणिज्य सप्ताह साजरा करत आहेत. जवळजवळ 250 इतर कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. आंतरराष्ट्रीय व्यापार सुलभ, वेगवान, अखंडित आणि आगामी वर्षांमध्ये आमच्या अर्थव्यवस्थेसाठी विकासाचे इंजिन बनण्यासाठी तुम्ही केलेल्या सहकार्याकरिता आपण सर्व निर्यातदार आणि हितधारकांची प्रशंसा करतो असे गोयल यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री गोयल यांच्यासोबत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे सहसचिव अमिताभ कुमार हेदेखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

Continue reading

रणवीरने पहिल्याच दिवशी पछाडले शाहरुख खानला!

19 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या 'धुरंदर 2 : द रिव्हेंज'ने बॉलीवूडच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नाव कोरले. पहिल्याच दिवशी तब्बल ₹ 102.55 कोटी नेट कलेक्शन आणि जागतिक पातळीवर ₹ 200 कोटींचा आकडा पार करत हा चित्रपट बॉलीवूडचा सर्वकालीन सर्वात मोठा ओपनर...

क्रिकेटच्या या हंगामात दोन-तीन हजार रन्स करायचेत!

१३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी सध्या क्रिकेटच्या दुनियेतील सर्वात चर्चेतील चेहरा आहे. आयपीएल २०२६च्या आधी एका पत्रकाराने त्याला विचारलं की, "या हंगामात किती धावा करायच्या आहेत?" यावर वैभवने अगदी शांतपणे, निरागस उत्तर दिलं, "दोन-तीन हजार!" संपूर्ण पत्रकार परिषदेत हास्यकल्लोळ झाला....

४०व्या वर्षापूर्वी रजोनिवृत्ती? ते तर हृदयाने पाठवलेले पहिले पत्र!

अमेरिकेतील नॉर्थवेस्टर्न मेडिसिन या प्रतिष्ठित संस्थेने केलेल्या मोठ्या संशोधनातून एक महत्त्वाचा आणि चिंताजनक निष्कर्ष समोर आला आहे. वयाच्या ४०व्या वर्षापूर्वी नैसर्गिकरित्या रजोनिवृत्ती (मेनोपॉज) आलेल्या महिलांना हृदयरोगाचा (कोरोनरी हार्ट डीसीज) धोका इतर महिलांपेक्षा तब्बल ४० टक्के अधिक असतो. हा अभ्यास...
Skip to content