Homeकल्चर +बिग बॉसमध्ये आज...

बिग बॉसमध्ये आज रंगणार दादुस ऑर्केस्ट्रा!

बिग बॉस मराठीच्या कार्यक्रमाचा आज पाचवा दिवस. बिग बॉसच्या घरात आज टास्कसोबतच रंगणार जबरदस्त कार्यक्रम– दादुस ऑर्केस्ट्रा– फॅशन शोभेल तुला!

काल प्रक्षेपित झालेल्या प्रोमोमध्ये अचानक दोन महिला आणि दोन पुरुष वेगळ्याच गेटअपमध्ये दिसून आले. कोण आहेत हे नवीन सदस्य असा प्रश्न मनात येऊन गेला.. पण तसं काही नाहीये.. उत्कर्ष शिंदे आणि विकास पाटील यांनी बायकांचा गेटअप तर सुरेखा कुडची आणि मीनल शाह हिने पुरुषांचा गेटअप केला आहे. चौघेही त्यामध्ये एकदम परफेक्ट दिसत आहेत, असं म्हणायला हरकत नाही.

दादुस ऑर्केस्ट्रा– फॅशन शोभेल तुला.. या कार्यक्रमात विकास पाटील ‘हृदयी वसंत फुलताना’ या गाण्यावर मीनल शाहसोबत नृत्य सादर करणार आहे तर उत्कर्ष शिंदे, सुरेखा कुडची यांच्यासोबत ही ‘पोरगी साजूक तुपातली’ या गाण्यावर धम्माल डान्स करणार आहे. यांना साथ मिळणार आहे दादुस (संतोष चौधरी) याची. घरातला माहोल एकदम हलकाफुलका होताना दिसणार आहे आणि सदस्यांनी बरीच धम्माल मस्ती केलेली दिसणार आहे.

बिग बॉसच्या घरात दरदिवशी नाही, दर मिनिटाला नाही, तर सेंकदाला स्ट्रॅटेजी बदलत असते. यामध्ये कोणाचा गेम काय आहे, कोणाच्या मनामध्ये काय आहे, कोण कोणाच्या बाजूने आहे हे सांगणं खूप कठीण असतं. प्रत्येक सदस्य आपल्या ग्रुपला, आपल्या जवळच्या माणसांना, स्वत:ला वाचवण्याच्या मागे असतो. आज जय आणि उत्कर्ष अशीच काही स्ट्रॅटेजी आखताना दिसणार आहेत. आता ती नक्की कोणाबद्दल आहे? हे आजच्या भागामध्ये कळेल…

जय, उत्कर्ष बोलताना दिसणार आहे, “ती इझिली मॅन्युपलेट होणारी आहे. ती आपल्या बाजूने कधीपण होऊ शकते. ती ओपन माईंडेड झाली आहे आता. आणि दुसरी सदस्य जी आहे ना.. तिला इतक्या लवकर नको बाहेर काढूया… बडबड बडबड आहे ती.. कॉमेडी कंटेंट आहे…

उत्कर्ष म्हणाला, “त्याला पण आता नको बाहेर काढूया. त्याला नंतरसाठी ठेऊया. जय पुढे म्हणाला आहे की, “दर शोला एक जोकर लागतो. तो जोकर आहे. त्याचा वीक पॉईंट आपल्याला माहित आहे. इमोशनल ब्रेकडाऊन होतो त्याचा. त्याला जास्त दिवस भाव नाही ना दिला तर तो एकटा पडणार. त्याला विचारायचा नाही, एडव्हाईसपण नको देऊस. आता “तो” नक्की कोण आहे? कोण आहे घरातला जोकर? कोणाबद्दल जय आणि उत्कर्ष बोलत आहेत, हे कळेलच.

आज सोनाली करणार आहे गायत्री दातारची एकेटिंग. काय आहे मीनल शाहचं म्हणणं, यासाठीवर बघा बिग बॉस मराठी, आज रात्री.. कलर्स मराठीवर..

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content