Homeकल्चर +बिग बॉसमध्ये आज...

बिग बॉसमध्ये आज चिऊताई, चिऊताई.. दार उघड!

चिऊ ताई चिऊ ताई दार उघड.. बिग बॉसच्या घरात रंगणार हा नवा टास्क..

आता सुरू होणार खरा खेळ! बिग बॉसच्या घरात सदस्यांना नवनवे टास्क दिलेच जातात. आणि टास्कमध्ये काही सदस्य बाजी मारतात तर काहींच्या हाती हार येते. बिग बॉस मराठी सिझन तिसऱ्याच्या नॉमिनेशन टास्कनंतर आता बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रंगणार आहे एक नवा टास्क.. “चिऊ ताई, चिऊ ताई, दार उघड..”.

आता हा टास्क नक्की काय असणार आहे? या टास्कमध्ये नक्की काय घडेल? काय चॅलेंज दिले जाणार आहे? कोण बाजी मारेल? काय स्वरूप असेल या टास्कचं? हे सगळं आजच्या भागामध्ये कळणार आहे.

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आपल्या जवळच्या माणसांची, घरच्यांची आठवण येणं अगदी सहाजिक आहे. सोनाली पाटील आज शिवलीला यांच्याशी बोलताना, आठवणी सांगताना भावुक होताना दिसणार आहे. सोनाली शिवलीलाला तिच्या वडिलांबाबतच्या काही आठवणी सांगणार आहे.

सोनाली म्हणते- माझा त्यांच्यासोबतचा शेवटचा कार्यक्रम आठवला. माझी मालिका सुरू असतानाच पप्पा वारले. त्यांनी माझी मालिका वैजू बघितलीच नाही. कुठलंच कारण नाही, अचानक एखादा माणूस तुम्हाला सोडून जातो.. त्याचंच वाईट वाटतं.

शिवलीला तिची समजूत काढते. म्हणते.. म्हणजे तुमचा प्रवास सुरू झालेलाच त्यांनी नाही बघितलं. तुला असं वाटतं की, त्यांनी पाहिलं नाही. पण तुला हेदेखील माहित आहे की ते बघत आहेत.. आणि ते आता जिथे असतील तिथे खुश असतील..

आता तू बिग बॉसच्या घरामध्ये आहेस. तू वाईट वाटून नको घेऊस.. तुला अभिमान वाटला पाहिजे.

आजच्या भागात पुन्हा एकदा कालच्या मुद्द्यावरून मीरा आणि स्नेहामध्ये मोठ भांडण होणार आहे. मीराला नक्की कोणत्या गोष्टीचा राग आला आहे? त्यामध्ये नक्की घडणार? कोणाची बाजू कोण घेणार? स्नेहा तिचा मुद्दा पटवून देऊ शकेल?

नुकत्याच बाहेर आलेल्या प्रोमोमध्ये असे दिसत आहे की घरातली पुरूष मंडळी महिला सदस्यांना काहीतरी विनवणी करण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रोमोमध्ये आविष्कार मीराला सांगताना दिसत आहे, “आम्ही तुमची सेवा करू इच्छितो.. त्यावर मीराच म्हणणं पडलं- “तुम्ही ऐकतचं नाही ना माझं..”.

जयदेखील सांगताना दिसला की, मला निवडा.. विशाल, विकास पाटील, अक्षय वाघमारे, उत्कर्ष शिंदे, संतोष (दादुस) सगळीच पुरुष मंडळी घरातल्या स्त्रियांना आपला मुद्दा पटवून देताना दिसत आहेत. बघूया कोण बाजी मारेल.. या टास्कमध्ये.. बिग बॉस मराठीच्या आजच्या भागात.. रात्री ९.३० वाजता. कलर्स मराठीवर..

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content