Homeकल्चर +‘पितृपक्ष आणि श्राद्धविधी’वर...

‘पितृपक्ष आणि श्राद्धविधी’वर आज ‘ऑनलाईन’ संवाद!

गणेशोत्सव झाल्यावर पितृपक्षाला प्रारंभ होतो. हिंदू धर्मात ‘पितृऋण’ फेडण्यासाठी श्राद्धविधी करण्याला विशेष महत्त्व दिले आहे. मात्र, समाजात श्राद्ध करण्याचे महत्त्व आणि त्याविषयीचे धर्मशास्त्र माहित नसल्यामुळे श्राद्धाविषयी अनेक अपसमज पसरलेले आहेत. अशावेळी शास्त्र समजून धर्माचरण केल्यास त्याचा अधिक लाभ होतो. यासाठी श्राद्धपक्षाविषयी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पितृपक्ष आणि श्राद्धविधी: शास्त्र अन् शंकानिरसन’ या ‘ऑनलाईन’ विशेष संवादाचे आयोजन करण्यात आले आहे.

काल 19 सप्टेंबर 2021 यादिवशी सायंकाळी 7 वाजता हिंदी आणि कन्नड या भाषांत, ही माहिती देण्यात आली. आज, 20 सप्टेंबर 2021 यादिवशी सायंकाळी 7 वाजता मराठी भाषेत हा कार्यक्रम होणार आहे. याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्यावतीने करण्यात आले आहे.

मराठी भाषेत सनातन संस्थेचे धर्मप्रसारक संत सद्गुरू नंदकुमार जाधव या विषयावर संबोधित करणार आहेत. हिंदी भाषेत हिंदु जनाजागृती समितीचे धर्मप्रसारक संत पू. नीलेश सिंगबाळ, तर कन्नड भाषेत सनातन संस्थेचे धर्मप्रसारक संत पू. रमानंद गौडा यांनी या विषयावर मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमात प्रामुख्याने ‘पितृपक्षात नेमके कोणत्या दिवशी श्राद्ध करणे चांगले असते?’, ‘श्राद्ध नेमके कुणी करावे?’, ‘सध्या कोरोनाची महामारी चालू असताना श्राद्धासाठी पुरोहित उपलब्ध न झाल्यास काय करावे?’, ‘श्राद्धाचे साहित्य उपलब्ध न झाल्यास श्राद्धपक्ष कसा करावा?’, ‘पितृदोष दूर करण्यासाठीचे उपाय काय आहेत?’ अशा अनेक प्रश्‍नांची उत्तरे दिली जाणार आहेत.

हा कार्यक्रम पुढील लिंकवर प्रसारित करण्यात येणार आहे.

  1. मराठी आणि हिंदी भाषेत: Youtube.com/HinduJagruti
  2. कन्नड भाषेत: Youtube.com/HJSKarnataka

Continue reading

सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी पुण्यात विशेष पासपोर्ट मोहीम

नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर नियोजित वेळ मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पासपोर्ट उपलब्द व्हावा म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, 'सामान्य' आणि 'तत्काळ' श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातल्या 'प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट...

15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2022-23!

घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले...

नवी मुंबईतले ‘एपीएमसी’ पोहोचले राष्ट्रीय स्तरावर!

राज्याच्या कृषी आणि पणन क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रशासकीय बदल झाला असून, नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)ला आता अधिकृतरीत्या 'राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार' (एमएनआय - मार्केट ऑफ नॅशनल इंपॉर्टन्स) म्हणून घोषित करण्यात आले आहे....
Skip to content