कोविड-१९ प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत, मुंबई महापालिकेच्या वतीने उद्या शुक्रवारी (१७ सप्टेंबर २०२१) सकाळी १०.३० ते सायंकाळी ६.३० या वेळेत, मुंबईतील सर्व शासकीय आणि महापालिका कोविड-१९ लसीकरण केंद्रांवर फक्त महिलांसाठी राखीव असे विशेष लसीकरण सत्र राबवले जाणार आहे. ह्यात महिलांना थेट लसीकरण केंद्रावर जाऊन कोविड लसीची पहिली किंवा दुसरी मात्रा घेता येणार आहे. ह्या विशेष सत्रामुळे उद्यासाठीची ऑनलाईन पूर्वनोंदणी बंद ठेवण्यात येणार आहे.
कोविड-१९ विषाणू प्रतिबंधक लसीकरण अधिकाधिक वेगाने आणि सर्व स्तरातील नागरिकांपर्यंत नेण्यासाठी मुंबई महापालिकादेखील प्रयत्नशील आहे. त्यासाठी विशेष सत्र राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून फक्त महिलांसाठी राखीव असे विशेष कोविड लसीकरण सत्र उद्या शुक्रवारी, १७ सप्टेंबरला सकाळी १०.३० ते सायंकाळी ६.३० ह्या वेळेत राबवले जाणार आहे.
मुंबईतील सर्व २२७ निर्वाचन प्रभागांमधील लसीकरण केंद्र आणि त्यासोबत सर्व शासकीय व महापालिका रुग्णालये आणि कोविड सेंटर येथील लसीकरण केंद्रावर थेट जाऊन (वॉक इन) महिलांना कोविड लस घेता येणार आहे. पहिली किंवा दुसरी मात्रा ह्या सत्रात दिली जाणार आहे, असे पालिकेने कळविले आहे.

