Homeकल्चर +गायक-संगीतकार प्रकाश येवारे...

गायक-संगीतकार प्रकाश येवारे यांचे निधन!

ज्येष्ठ गायक व संगीतकार प्रकाश शिवाजीराव येवारे यांचे आज पहाटे डोंबिवली येथील राहत्या घरी झोपेतच निधन झाले. ते ५० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई-वडील, दोन विवाहीत बंधू, एक विवाहीत बहिण, दोन पुतणे, दोन भाच्या, एक नात असा मोठा परिवार आहे.

प्रकाश हे उत्तम गायक, संगीतकार व संगीत शिक्षक होते. ते डोंबिवली येथे संगीताचा क्लास चालवीत. त्यांच्या हाताखाली संगीताचे धडे गिरविलेल्या अनेक तरुण-तरुणींनी टीव्ही चॅनेल्सवरील विविध रिएलिटी शोमध्ये गायनात आणि संगीतात घवघवीत यश मिळविले आहे. प्रकाश यांनी एक-दोन मराठी मालिकांनादेखील पार्श्वसंगीत दिले होते.

प्रकाशजी हे कलाकार म्हणून जितके मोठे होते तितकेच ते माणूस म्हणूनदेखील मोठे होते. संगीत क्लासची फी भरण्याची क्षमता नसलेल्या अनेक कलाकारांना त्यांनी न कुरकुरता मोफत प्रशिक्षण दिले. मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वि. वाबळे यांचे ते मेहुणे होत.

आज दुपारी डोंबिवली येथील शिवमंदिर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे चिरंजीव यश यांनी त्यांच्या चितेला अग्नी दिला.

Continue reading

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या सभागृहात तबला वादन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन वयोगटात घेतली जाईल. (छोटा वयोगट १० ते १५ वर्षे आणि मोठा वयोगट १६ ते २५...

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...
Skip to content