Homeकल्चर +रविवारी ऑनलाईन ऐका...

रविवारी ऑनलाईन ऐका ललित राव यांचे ध्वनिमुद्रित गायन

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने ‘स्वरसंचित’ ह्या कार्यक्रमात रविवार दिनांक १२ सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजता आग्रा घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका ललित राव यांच्या गायनाचे ध्वनिमुद्रण प्रसारित करण्यात येणार आहे.

ललित राव यांनी संगीताचे शिक्षण पं. रामराव नाईक, पं. दिनकर कैकिणी, उस्ताद खादीम हुसेन खाँ साहेब यांच्याकडून घेतले. त्यांनी भारतात आणि परदेशात गायनाचे कार्यक्रम केले आहेत. शास्त्रीय संगीत संग्रहित करण्यासाठी त्यांचे मोठे योगदान आहे. ख्याल, ध्रुपद, धमार, ठुमरी, तराणा, होरी अशा शास्त्रीय संगीताच्या अनेक प्रकारांवर त्यांचे प्रभुत्व आहे.

कार्यक्रमाची लिंक कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी केंद्राच्या www.dadarmatungaculturalcentre.org या वेबसाईटवर उपलब्ध होईल.

Continue reading

सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी पुण्यात विशेष पासपोर्ट मोहीम

नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर नियोजित वेळ मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पासपोर्ट उपलब्द व्हावा म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, 'सामान्य' आणि 'तत्काळ' श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातल्या 'प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट...

15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2022-23!

घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले...

नवी मुंबईतले ‘एपीएमसी’ पोहोचले राष्ट्रीय स्तरावर!

राज्याच्या कृषी आणि पणन क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रशासकीय बदल झाला असून, नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)ला आता अधिकृतरीत्या 'राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार' (एमएनआय - मार्केट ऑफ नॅशनल इंपॉर्टन्स) म्हणून घोषित करण्यात आले आहे....
Skip to content