Homeमुंबई स्पेशलमुंबईत उद्या फुकट...

मुंबईत उद्या फुकट मिळणार नाही लसीचा पहिला डोस!

कोविड-१९ विषाणू प्रादुर्भाव पुन्हा वाढू नये, यासाठी प्रत्येक नागरिकाने कोविड लसीचे दोन्ही डोस घेऊन लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेता, मुंबईतील सर्व शासकीय आणि महापालिका लसीकरण केंद्रावर, शनिवारी, ४ सप्टेंबर २०२१ रोजी कोविड-१९ लसीचा दुसरा डोस घेणाऱ्या लाभार्थ्‍यांसाठी विशेष सत्र आयोजित करण्यात आले आहे. त्यामुळे यादिवशी कोविड लसीचा पहिला डोस कोणालाही दिला जाणार नाही. ज्यांना लसीचा पहिला डोस घ्यावयाचा आहे त्यांना खाजगी लसीकरण केंद्रांवर निर्धारित शुल्क देऊन घेता येईल.

मुंबईसह भारतात कोविड-१९ विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी कोविड-१९ लस उपलब्ध झाली आहे. या अनुषंगाने राष्ट्रीय कोविड-१९ लसीकरण कार्यक्रमांतर्गत १६ जानेवारी २०२१पासून मुंबई महापालिका क्षेत्रात लसीकरण टप्प्याटप्प्याने सुरू आहे. या लसीकरण कार्यक्रमामध्‍ये १ सप्टेंबर २०२१पर्यंत ६९ लाख २६ हजार २५५ लाभार्थ्‍यांना पहिली मात्रा (डोस) तर २५ लाख १७ हजार ६१३ लाभार्थ्‍यांना दुसरी मात्रा देण्‍यात आली आहे. या आकडेवारीवरुन असे निदर्शनास येते की, पहिल्या मात्रेच्या तुलनेत दुसरी मात्रा घेणाऱ्या लाभार्थ्‍यांचे प्रमाण कमी आहे.

ब्रेक द चेन, याअंतर्गत नव्‍याने सुधारीत तत्त्‍वे प्रसारीत करण्‍यात आलेली आहेत. त्यात सार्वजनिक निर्बंध शिथिल होऊन विविध आस्‍थापना सुरू झालेल्या आहेत. दोन्ही डोस घेतलेल्‍या लाभार्थ्‍यांना उपनगरीय रेल्‍वे प्रवासाची मुभादेखील देण्‍यात आलेली आहे.

सद्यस्थितीत, कोविड-१९ या आजाराची रुग्‍णसंख्‍या काहीशी वाढत आहे. तसेच, कोविडची तिसरी लाट येण्‍याची शक्‍यता वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तवली आहे.‍ या सर्व पार्श्वभूमीवर, कोविड-१९ लसीचा दुसरा डोस (कोविशिल्‍ड असल्यास पहिल्या डोसनंतर ८४ दिवस आणि कोव्‍हॅक्‍सिन असल्यास पहिल्या डोसनंतर २८ दिवस पूर्ण झाल्‍यास) घेऊन नागरिकांचे लसीकरण पूर्ण होणे आवश्‍यक आहे.

यामुळे अनुषंगाने, मुंबई महापालिकेने, मुंबईतील सर्व शासकीय व सार्वजनिक लसीकरण केंद्रावर, उद्या शनिवारी, ४ सप्टेंबर २०२१ रोजी कोविड-१९ लसीचा दुसरा डोस घेणाऱ्या लाभार्थ्‍यांसाठी विशेष सत्र आयोजित केले आहे. म्हणजेच, उद्या दिवशी शासकीय आणि पालिका लसीकरण केंद्रांवर कुणालाही पहिला डोस दिला जाणार नाही. त्यामुळे दुसरा डोस देय असणाऱ्या नागरिकांनी या विशेष सत्राचा जास्‍तीतजास्‍त प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

Continue reading

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या सभागृहात तबला वादन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन वयोगटात घेतली जाईल. (छोटा वयोगट १० ते १५ वर्षे आणि मोठा वयोगट १६ ते २५...

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...
Skip to content