Homeटॉप स्टोरीयुके, युरोपमधून येणाऱ्या...

युके, युरोपमधून येणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक

कोविड-१९ विषाणूचे नवीन व वेगाने फैलावणारे प्रकार आढळल्याच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने, भारतात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या संदर्भात नवीन मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. त्यानुसार, जे आंतरराष्ट्रीय प्रवासी युके, युरोप, मध्यपूर्व, दक्षिण आफ्रिका, ब्राझिल, बांगलादेश, बोत्स्वाना, चीन, मॉरिशस, न्यूझीलँड, झिम्बाब्वे या देशांमधून अथवा या देशांमार्गे हवाई प्रवास करुन मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर येतील, त्या सर्व प्रवाशांना मुंबई विमानतळावर आगमनानंतर स्वखर्चाने आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक राहणार आहे. ३ सप्टेंबर २०२१ रोजी मध्यरात्रीपासून हा नियम लागू राहणार आहे.

सरकारच्या नवीन मार्गदर्शक सुचनांनुसार, हवाई प्रवास करुन येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी संस्थात्मक विलगीकरणाची (institutional quarantine) तरतूद रद्द करण्यात आली आहे. असे असले तरी, आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. त्याआधारे मुंबई महापालिकेकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

याआधी या प्रवाशांमध्ये लसीचे दोन डोस झालेले प्रवासी, ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आदींना सूट देण्यात येत होती. नव्या निर्णयानुसार ही सूट आता देण्यात येणार नाही.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन होणारे अथवा आगमन होऊन पुढे जाण्यासाठी दुसरे विमान निवडलेले इतर सर्व आंतरराष्ट्रीय प्रवासी (युके, युरोप, मध्यपूर्व,  दक्षिण आफ्रिका, ब्राझिल, बांगलादेश, बोत्स्वाना, चीन, मॉरिशस, न्यूझीलँड, झिम्बाब्वे वगळता) यांना मागील ७२ तासांमधील निगेटिव्ह आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल सादर करणे आवश्यक असेल. त्यानंतर ते विमानतळ सोडू शकतात. असा निगेटिव्ह चाचणी अहवाल सादर करणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना मुंबई विमानतळावर आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक नसेल. ही तरतूददेखील ३ सप्टेंबर २०२१ रोजी मध्यरात्रीपासून लागू राहणार आहे.

सर्व प्रवाशांनी विहित नमुन्यातील स्वयंघोषणा-पत्र (self-declaration form) तसेच हमीपत्र (undertaking) भरुन मुंबई विमानतळावर नियुक्त संबंधित अधिकाऱ्यांकडे देणे आवश्यक असेल आणि या प्रवाशांना १४ दिवस गृह विलगीकरणात (home quarantine) राहणे बंधनकारक असेल.

सर्व मार्गदर्शक सूचनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करता यावी यासाठी, मुंबई विमानतळाचे संचालन करणाऱ्या यंत्रणेकडून, प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यासाठी आवश्यक असलेली पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे. सरकारने निश्चित केलेल्या दरानुसार, म्हणजे ३ सप्टेंबर २०२१ रोजी लागू असलेले प्रति चाचणी रुपये ६००-/ याप्रमाणे चाचणीसाठीचे शुल्क आकारण्यात येईल. चाचण्या वेगाने करणे शक्य व्हावे म्हणून प्रतितास सुमारे ६०० प्रवाशांची चाचणी करता येईल, इतक्या क्षमतेची व्यवस्था करण्यात आली आहे.

Continue reading

एलिमेंट्स आर्ट क्लासेसचे अप्रतिम प्रदर्शन

एलिमेंट्स आर्ट क्लासेस च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्याच्या कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण आर्ट गॅलरी येथे पंचतत्व या तीन दिवसांचे वार्षिक कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सहा ते १८ वर्षे वयोगटातल्या जवळजवळ ४५ विद्यार्थ्यांच्या सुमारे ९० कलाकृती या प्रदर्शनात...

अकरावी प्रवेशासाठी नंतर सादर करा गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला

राज्यातल्या इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेत सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची अट शिथिल केली आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर...

सौरभ विजय यांनी दिला डिजिटल नवोपक्रमावर भर

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (UIDAI) मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ विजय यांनी मुंबईतील युआयडीएआय प्रादेशिक कार्यालयाला नुकतीच भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच प्रादेशिक दौरा आहे. युआयडीएआय प्रादेशिक कार्यालय,...
Skip to content