Homeकल्चर +दत्त संप्रदायाला वाहून...

दत्त संप्रदायाला वाहून घेतलेले नवे ओटीटी चॅनेल सुरू!

‘अवधूत चिंतन क्रिएशन्स प्रा. ली.’ या कंपनीने नुकतेच ‘अनघाष्टमी’च्या मुहूर्तावर “अवधूत चिंतन” या मोबाईल ॲपचे म्हणजेच ओटीटी प्लॅटफॉर्मचे लोकार्पण केले आहे. दत्तात्रय महाराजांच्या ध्येयवेड्या भक्तरुपी सेवकांनी मिळून श्री गुरुदेव दत्त महाराजांविषयीची माहिती जगभरात सर्वत्र नव्या पिढीपर्यंत पोहोचत राहवी म्हणून हे महत्त्वाकांक्षी कार्य सुरू केले आहे.

श्री गुरु दत्त महाराजांच्या अवतारांच्या चरित्र कथा “अवधूत चिंतन” या ओटीटी प्लॅटफॉर्मवर वेब सीरिज माध्यमातून प्रथमच येत आहेत. अध्यात्म आणि मनोरंजन यांचा सुरेख मिलाफ असणाऱ्या “श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये” आणि ‘श्री स्वामी समर्थ’ यांच्यावरील मालिका “स्वामी हो..” या प्रेक्षकांच्या पसंतीस अल्पावधीतच उतरल्या आहेत.

“अवधूत चिंतन” या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या निर्मिती प्रक्रियेत प्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक असित रेडीज, मिलिंद जाधव आणि तेजस आर्ते यांनी सेवेकरी या नात्याने अहोरात्र मेहनत घेऊन हे अत्यंत वेगळे आणि सकस मनोरंजनासोबतच महत्त्वपूर्ण माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करणार आहे.

या ओटीटी प्लॅटफॉर्मचे कंटेंट हेड आणि क्रिएटिव्ह हेड असित रेडीज असून ख्यातनाम लेखक प्रविण शांताराम यांनी वरील दोन्ही सीरिजचे पटकथा आणि संवादलेखन केले आहे. दिग्दर्शनाची धुरा असित रेडीज यांच्या सोबतीने दीपक देसाई यांनी सांभाळली आहे.

“अवधूत चिंतन” या मोबाईल ॲपवर सुरू असलेल्या दर्जेदार मालिका मराठी प्रेक्षकांसोबत सर्वभाषिक प्रेक्षकांच्या मनाची पकड घेत आहेत. संपूर्ण जगात पहिल्यांदाच असा स्तुत्य उपक्रम हाती घेतल्याबद्दल अनेक मान्यवरांनी निर्मात्यांचे अभिनंदन केले आहे. त्याचबरोबरीने पिठापूर, कुरवपूर, गाणगापूर, अक्कलकोट, कारंजा, गिरनार येथील प्रमुखांनी “अवधूत चिंतन” या ओटीटी प्लॅटफॉर्मला शुभेच्छा व आशीर्वाद दिले आहेत.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content