Homeकल्चर +बाबासाहेब पुरंदरेंच्या प्रेरणादायी...

बाबासाहेब पुरंदरेंच्या प्रेरणादायी आवाजात ऐका संपूर्ण ‘शिवचरित्रकथन’!

बाबासाहेब पुरंदरे यांनी त्यांच्या समर्थ लेखणीतून “राजा शिवछत्रपती” यांचा इतिहास विविध प्रेरणादायी ग्रंथांतून त्यांच्या ओघवत्या शैलीद्वारे मांडला आहे. शिवरायांवरील हे अलौकिक साहित्य प्रत्येक मराठी माणसाने एकदातरी ऐकायलाच हवे. ‘स्टोरीटेल’ या आघाडीच्या संस्थेने पुढाकार घेत बाबासाहेब पुरंदरे यांच्या प्रेरणादायी आवाजात १९८३ साली ध्वनीमुद्रित केलेल्या ‘संपूर्ण शिवचरित्रकथनाचे’ पंधरा भाग खास इतिहासप्रेमी, साहित्यरसिकांसाठी ‘ऑडिओबुक’मध्ये उपलब्ध करून दिले आहेत.

खुद्द बाबासाहेब पुरंदरेंचे ओरिजनल सादरीकरण ऐकण्याचा एक विलक्षण नजराणा बाबासाहेबांच्या ‘शतकोत्सवी’ वर्षानिमित्त शिवप्रेमी साहित्यरसिकांना ‘स्टोरीटेल’ने दिला आहे. यात पंधरा भागांची संपूर्ण ‘शिवचरित्रकथन’ व्याख्यानमाला बाबासाहेबांच्या प्रेरणादायी आवाजात ऐकता येणार आहे. याशिवाय त्यांनी सांगितलेल्या हिरकणी, प्रतापराव गुजर, बुलंद बुरूज अशा ऐतिहासिक सात कथाही स्वतंत्रपणे ऐकायला मिळणार आहेत.

शिवप्रेमींसोबतच सर्वसामान्य साहित्यप्रेमीही बाबासाहेबांच्या वाणीतून हे ‘शिवचरित्रकथन’ ऐकताना एकरूप होतात. ‘शिवचरित्रकथन’मध्ये शिव पूर्वकाळ, शिव जन्म, बालपण, स्वराज्याची प्रतिस्थापना, स्वराज्य विस्तार, अफझल खान स्वारी, अफझल खान पराभव, पावन खिंड, फिरंगोजी नरसाळ, लाल महालावर छापा, सुरतेवर स्वारी, मिर्झाराजे जयसिंग, अग्र्यातून सुटका, तानाजी, राज्याभिषेक असा शिवकालीन इतिहास बाबासाहेबांच्या रसाळ वाणीतून इतिहासप्रेमींना ऐकायला मिळणार आहे.

‘स्टोरीटेल’ ही स्वीडिश कंपनी असून ती जगातील २१हून अधिक देशात आणि २५हून अधिक भाषेत ऑडिओबुक प्रकाशित व वितरित करणारी आंतरराष्ट्रीय कंपनी आहे. सध्या भारतात मराठी, हिंदी, इंग्रजी आदी भाषांसह ११ भारतीय भाषांतील पुस्तके या एपवर उपलब्ध आहेत. ही ऑडिओबुक्स कधीही कुठेही आणि कितीही ऐकता येऊ शकतात. मराठीमध्ये शिवचरित्रकथनबरोबरच इतिहासप्रेमींसाठी ना स इनामदार यांच्या झेप, झुंज अशा कादंबऱ्या, गो नी दांडेकर यांच्या पडघवली, पवनाकाठचा धोंडी, कुण्या एकाची भ्रमणकथा, शिवाजी सावंत यांच्या मृत्युंजय, युगंधर यासारख्या लोकप्रिय कादंबऱ्या ऑडिओमध्ये ऐकायला मिळत आहेत.

मराठी साहित्य विश्वातील नामवंत लेखकांपैकी ह. ना. आपटे, वि. स. खांडेकर, पु. ल. देशपांडे, व्यंकटेश माडगूळकर, द. मा. मिरासदार, व. पु. काळे, रणजित देसाई, साने गुरुजी,  सुनीता देशपांडे, अरूणा ढेरे आदी अनेकांचे सर्वोत्तम साहित्य स्टोरीटेल ऑडिओबुक स्वरूपात उपलब्ध आहे. हे सर्व साहित्य नामवंत अभिनेते विक्रम गोखले, दिलीप प्रभावळकर, मृणाल कुलकर्णी, सचिन खेडेकर, गिरीश कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी,  शुभांगी गोखले, संदीप कुलकर्णी आदींच्या आवाजात ऐकायला मिळेल.

Continue reading

सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी पुण्यात विशेष पासपोर्ट मोहीम

नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर नियोजित वेळ मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पासपोर्ट उपलब्द व्हावा म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, 'सामान्य' आणि 'तत्काळ' श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातल्या 'प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट...

15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2022-23!

घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले...

नवी मुंबईतले ‘एपीएमसी’ पोहोचले राष्ट्रीय स्तरावर!

राज्याच्या कृषी आणि पणन क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रशासकीय बदल झाला असून, नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)ला आता अधिकृतरीत्या 'राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार' (एमएनआय - मार्केट ऑफ नॅशनल इंपॉर्टन्स) म्हणून घोषित करण्यात आले आहे....
Skip to content