Homeचिट चॅटरणजित दळवी, सुनील...

रणजित दळवी, सुनील लवाटे, जान्हवी मुळे आणि स्वदेश घाणेकर यांचा होणार गौरव

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने क्रीडा पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणार्‍या पत्रकारांना दरवर्षी प्रदान करण्यात येणार्‍या क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदा २०२५ आणि २०२६ या दोन वर्षांसाठी ज्येष्ठ आणि युवा अशा दोन गटांतील चार पत्रकारांची पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे. कै. महेश बोभाटे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार २०२५ ज्येष्ठ क्रीडा पत्रकार रणजित दळवी यांना, तर २०२६चा पुरस्कार सुनील लवाटे यांना जाहीर करण्यात आला आहे. युवा क्रीडा पत्रकारांच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी देण्यात येणारा कै. आत्माराम मोरे युवा क्रीडा पत्रकार पुरस्कार २०२५ बीबीसीच्या जान्हवी मुळे यांना, तर २०२६चा पुरस्कार स्वदेश घाणेकर यांना जाहीर करण्यात आला आहे.

प्रत्येक पुरस्काराचे स्वरूप रुपये १० हजार रोख, गौरवचिन्ह आणि सन्मानपत्र असे आहे अशी माहिती पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी दिली. मुंबई मराठी पत्रकार संघाला ८४ वर्षांची समृद्ध परंपरा असून पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्याची परंपरा संघाने सातत्याने जपली आहे. त्याचाच एक भाग म्हणून क्रीडा पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानाची दखल घेण्यासाठी संघातर्फे क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतात. यंदाचे हे नववे वर्ष आहे. पुरस्कार विजेत्यांचा मुंबई मराठी पत्रकार संघाच्या विशेष क्रीडा पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे. क्रीडा पत्रकारितेच्या माध्यमातून खेळाडूंची कामगिरी, संघर्ष आणि क्रीडा क्षेत्रातील विविध घडामोडी वाचकांपर्यंत पोहोचविणार्‍या पत्रकारांच्या योगदानाचा सन्मान करणे हा या पुरस्कारांमागील प्रमुख उद्देश असल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे.

Continue reading

राज्य नाट्य स्पर्धेसाठी पत्रकार संघाकडून ‘ही परी अस्मानीची’!

मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे यंदाच्या ६५व्या राज्य नाट्य स्पर्धेसाठी ‘ही परी अस्मानीची’ या नाटकाची निवड करण्यात आली आहे. या नाटकाच्या नाट्यसंहितेचे पूजन लोकनेते, माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते पत्रकार संघाच्या सभागृहात करण्यात आले. यावेळी मुंबई मराठी पत्रकार संघाचे...

आंतरशालेय तायक्वांडो स्पर्धेत खेलो तायक्वांडो अकादमीचे घवघवीत यश

मुंबईत नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या आंतरशालेय तायक्वांडो स्पर्धेत खेलो तायक्वांडो अकादमीच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत विविध वजनी गटांत १४ सुवर्ण, ९ रौप्य आणि १२ कांस्य पदकांची, अशी एकूण ३५ पदकांची घसघशीत कमाई केली. १४ आणि १७ वर्षांखालील या दोन...

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...
Skip to content