Homeकल्चर +एलिमेंट्स आर्ट क्लासेसचे...

एलिमेंट्स आर्ट क्लासेसचे अप्रतिम प्रदर्शन

एलिमेंट्स आर्ट क्लासेस च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्याच्या कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण आर्ट गॅलरी येथे पंचतत्व या तीन दिवसांचे वार्षिक कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सहा ते १८ वर्षे वयोगटातल्या जवळजवळ ४५ विद्यार्थ्यांच्या सुमारे ९० कलाकृती या प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत. राजश्री दादरकर आणि ऐश्वर्या साठे यांच्या उपस्थितीत या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.

वायू, जल, पृथ्वी, अग्नी आणि आकाश, या निसर्गातल्या पाच तत्त्वांवर आधारित विविध प्रकारचे साहित्य टेक्सचर आणि कलात्मक तंत्रांचा वापर करून तयार केलेल्या आकर्षक कलाकृती या प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत. निसर्ग, सर्जनशीलता आणि मानवी भावना यांचा अप्रतिम संगम या कलाकृतींमधून दर्शकांना अनुभवता येत आहे.

गेल्या सोळा वर्षांपासून एलिमेंट्स आर्ट क्लासेसच्या संचालिका प्रज्ञा कुलकर्णी लहान मुलांमधल्या कलागुणांना प्रोत्साहन देत आहेत. यंदाचे हे प्रदर्शन 29 मे 2026 रोजी सुरू झाले. आज या प्रदर्शनाचा अखेरचा दिवस आहे. रंगीबेरंगी चित्रांपासून नाविन्यपूर्ण मिक्स मिडिया कलाकृतींपर्यंतच्या अनेक कलाकृती या प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत..

एलिमेंट्स

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content