Homeपब्लिक फिगरशशी शेखर वेम्पती...

शशी शेखर वेम्पती सेन्सॉर बोर्डाचे नवे अध्यक्ष

केंद्र सरकारने शशी शेखर वेम्पती यांची केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ अर्थात सेन्सॉर बोर्ड (सीबीएफसी) च्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ६ मे २०२६ रोजीच्या अधिसूचनेत ही घोषणा केली. शशी शेखर वेम्पति हे पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून तीन वर्षांच्या कालावधीसाठी या पदावर असतील.

प्रसून जोशी यांची, प्रसार भारतीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यामुळे, जोशी यांनी सीबीएफसीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे ते पद रिक्त झाले होते. वेम्पती यांची या रिक्त जागी नेमणूक करण्यात आली. शशी शेखर वेम्पती यांना प्रसारमाध्यमे, प्रसारणसेवा आणि सार्वजनिक संवाद या क्षेत्रांचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे, सीबीएफसीचा कारभार अधिक मजबूत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

बंगालमध्ये सुवेंदू अधिकारींचा पीए गोळीबारात ठार! कारचालकही जखमी!!

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचे पानीपत झाल्यानंतर उफाळलेल्या हिंसाचारात बुधवारी रात्री उशिरा ममता बॅनर्जी यांना भवानीपूर मतदारसंघात पराभूत करणारे भारतीय जनता पार्टीचे नेते व मुख्यमंत्रीपदाचे दावेदार सुवेंदू अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक (पीए) चंद्रनाथ रथ यांच्यावर गोळीबार झाला....

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ भूमिगत मेट्रो स्थानकात आग

मुंबई मेट्रो लाईन ३ (अ‍ॅक्वा लाईन)च्या 'छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ' या भूमिगत स्थानकावर बुधवारी सायंकाळी आगीची मोठी घटना घडली. स्थानकाच्या तांत्रिक विभागातील सरकत्या जिन्याजवळ अचानक धूर निघू लागल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन...

‘ऑपरेशन सिंदूर’च्या वर्षपूर्तीला मुंबईत दहशतवादी हल्ल्याची धमकी

काश्मीर खोऱ्यातल्या पहलगाममध्ये पाक अतिरेक्यांनी तेथली पर्यटकांवर धर्म विचारून गोळ्या घातल्याच्या घटनेचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने पाकिस्तानवर केलेल्या ऑपरेशन सिंदूरला उद्या एक वर्ष पूर्ण होत आहे. या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील अतिशय प्रतिष्ठित आणि संवेदनशील मानल्या जाणाऱ्या कुलाबा येथील 'ताज...
Skip to content