Homeडेली पल्सफास्टॅग युझर्ससाठी ही...

फास्टॅग युझर्ससाठी ही आहे महत्त्वाची बातमी!

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) देशातील सर्व फास्टॅग जारी करणाऱ्या बँकांना एक महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. यामध्ये बँकांना त्यांच्याद्वारे जारी करण्यात आलेल्या फास्टॅगशी लिंक असलेल्या ‘वाहन नोंदणी क्रमांकांची’ त्वरित आणि अनिवार्य पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. टोल संकलन प्रणालीमध्ये अधिक पारदर्शकता आणि अचूकता आणण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. सर्व बँकांनी त्यांच्या डेटाबेसमध्ये असलेल्या वाहनांच्या नोंदणी क्रमांकांची अचूकता तपासणे आवश्यक आहे. अनेकदा फास्टॅग घेताना तात्पुरता नोंदणी क्रमांक वापरला जातो किंवा माहिती अपूर्ण असते. अशा प्रकरणांमध्ये आता अधिकृत ‘वाहन’ पोर्टलवरील माहितीशी जुळणी करून पडताळणी करावी लागणार आहे.

‘एक वाहन, एक फास्टॅग’ धोरण

या पडताळणीमुळे एकाच वाहनावर अनेक फास्टॅग असणे किंवा एकाच फास्टॅगचा वापर वेगवेगळ्या वाहनांसाठी करणे, अशा गैरप्रकारांना आळा बसेल.

वाहनधारकांवर काय परिणाम होणार?

ज्या वाहनधारकांचे फास्टॅग त्यांच्या योग्य नोंदणी क्रमांकाशी जोडलेले नाहीत किंवा ज्यांची कागदपत्रे अपूर्ण आहेत, अशा वापरकर्त्यांना बँकांकडून केवायसी अपडेट करण्याच्या सूचना मिळू शकतात. पडताळणी पूर्ण न झाल्यास संबंधित फास्टॅग काळ्या यादीत (ब्लॅकलिस्टेड) टाकला जाऊ शकतो, ज्यामुळे टोल नाक्यांवर दुप्पट टोल भरावा लागण्याची शक्यता आहे. नॅशनल इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन (एनईटीसी) प्रणाली अधिक सक्षम करण्यासाठी आणि महामार्गावरील प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी ‘एनएचएआय’ने हे कडक पाऊल उचलले आहे.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content