Homeकल्चर +रविवारी आनंद घ्या...

रविवारी आनंद घ्या रश्मी पराडकर-सुळे यांच्या गायनाचा

मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात येत्या रविवारी, ११ जानेवारीला एका विशेष संगीत सभेचे आयोजन करण्यात आले आहे. य. वि. भातखंडे पुरस्कृत पं. भातखंडे संगीत सभेअंतर्गत प्रसिद्ध गायिका रश्मी पराडकर-सुळे यांच्या गायन कार्यक्रम यावेळी सादर होणार आहे. हा कार्यक्रम सायंकाळी ५.०० वाजता केंद्राच्या सभागृहात होईल.

रश्मी पराडकर-सुळे, या शास्त्रीय संगीतातील एक प्रतिभावान कलाकार आहेत. त्यांच्या गायनाला साथसंगत करणार आहेत प्रसिद्ध तबलावादक पं. प्रवीण करकरे आणि संवादिनीवादक अनिरुद्ध गोसावी. हा कार्यक्रम संगीतप्रेमींसाठी एक उत्तम संधी असून, मुंबईतील सांस्कृतिक वातावरणाला आणखी समृद्ध करेल अशी अपेक्षा आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधावा- (०२२) २४३० ४१५०

Continue reading

यंदा देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस

देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या मान्सूनबाबत भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) चिंताजनक अंदाज वर्तवला आहे. यंदा मान्सूनचा (पाऊस) जोर ओसरण्याची शक्यता असून, पावसाचे प्रमाण सरासरीच्या ९२ म्हणजे 'बिलो नॉर्मल' राहण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने 'एल निनो' प्रभावामुळे हा धोका निर्माण झाला असल्याचे...

आशाताईंना देशभरातून भावपूर्ण श्रद्धांजली

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाची बातमी पसरताच देशभरातून शोकसंदेशांचा गहिवर लोटला. राष्ट्रपती भवनापासून ते सामान्य चाहत्यांपर्यंत, आणि मुंबईच्या गल्लीबोळांपासून ते आखाती देशांतील रेस्तराँपर्यंत, सर्वांनीच या महान स्वराला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशाताई रुग्णालयात दाखल...

आशाताईंवर आज संध्याकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

भारतीय संगीतसृष्टीतील एका युगाचा रविवारी अंत झाला. दादासाहेब फाळके पुरस्कार आणि पद्मविभूषण सन्मानाने गौरवलेल्या, जगातील सर्वाधिक गाणी रेकॉर्ड करणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे मुंबईत निधन झाले. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, बहुअवयव निकामी (मल्टी-ऑर्गन फेल्युअर) होऊन त्यांचे...
Skip to content