मुंबईतील कोविड काळात अग्रस्थानी उभे राहिलेले सार्वजनिक आरोग्य सेवेतील निवासी डॉक्टरांच्या असामान्य संघर्षकथांचा दस्तावेज आता पुस्तकाच्या रूपात वाचकांसमोर आला आहे. हे पुस्तक ‘कोविड 19 रेसिडेन्ट्स नरेटिव्ह्स: अ टेल ऑफ मुंबई रेसिडेंट डॉक्टर्स’ या द्विभाषिक (इंग्रजी व मराठी) पुस्तकाचे विमोचन नुकतंच सेठ जी. एस. मेडिकल कॉलेज व केईएम रुग्णालयाच्या डीन डॉ. संगीता रावत यांच्या हस्ते झाले.
हे पुस्तक केईएम मार्ड, या संघटनेच्या पुढाकाराने प्रकाशित करण्यात आले असून, यात केईएम, सायन आणि नायर रुग्णालयातील रेसिडेंट डॉक्टर्सनी अनुभवलेला कोविड काळाचं त्यांच्या शब्दांत, चित्रांत आणि भावविश्वात नोंदविला आहे. या पुस्तकाचे संपादन डॉ. दीपक मुंढे (माजी अध्यक्ष, केईएम मार्ड) यांनी केले असून डॉ. सुश्रुत इंगवले सहसंपादक आहेत. डॉ. दीपक मुंढे सध्या कुपवाडा येथे भारतीय सेनेत मेजरपदी कार्यरत आहेत.
या पुस्तकाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा संदेश देताना कोविड काळात आरोग्य सेवेचा मुख्य कणा असणाऱ्या रेसिडेंट डॉक्टरांचे अभिनंदन व आभार मानत हे पुस्तक सर्वांना प्रेरणादायी ठरेल असा विश्वास व्यक्त केला. पुस्तकाचा आशयलेख डॉ. अविनाश सुपे (माजी अधिष्ठाता आणि संचालक, बीएमसी मेडिकल कॉलेजेस व हॉस्पिटल्स) यांनी लिहिली आहे तर वरिष्ठ पत्रकार राम खांदारे यांनी प्रस्तावना लिहून या संघर्षकथांना भावनिक अधोरेखित केलं आहे.
या पुस्तकात रेसिडेंट डॉक्टर्सच्या अनुभवकथा, महामारीतील प्रत्यक्ष लढ्याची नोंद, रुग्णांच्या व स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्य जपण्यासाठी केलेल्या पराकाष्ठा आणि केईएम मार्डने विकसित केलेली डॉक्टर्ससाठीची सहाय्यव्यवस्था यांचा समावेश आहे. आरोग्यसेवकांचे निस्वार्थ कार्य, त्याग आणि एकात्मतेचे दर्शन घडवणारा हा ग्रंथ म्हणजे कोविड काळातील आरोग्य व्यवस्थेचा जिवंत इतिहासच म्हणावा लागेल. पुस्तकाच्या प्रकाशनावेळी उपस्थित डॉक्टर्स आणि पाहुण्यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना म्हटले की, “ही फक्त कथा नाही, तर एका पिढीने अनुभवलेल्या अदृश्य युद्धाची जाणीव आहे.” हा ग्रंथ प्रत्येक डॉक्टर, आरोग्य क्षेत्रातील विद्यार्थी, धोरणकर्ते आणि सामान्य नागरिकांनी वाचावा, कारण हा केवळ दस्तावेज नाही, तर माणुसकीचा उत्सव आहे.
हे पुस्तक आता Flipkart आणि Amazon वर उपलब्ध आहे.
Flipkart: https://dl.flipkart.com/s/SboE6PuuuN
Amazon: https://amzn.in/d/9j2IG5c

