सर्वद फाउंडेशन आणि सोनोपंत दांडेकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिल्या राज्यस्तरीय सर्वद साहित्य संमेलनात डॉ. सुचिता पाटील यांच्या `झाले जलमय’ या कथासंग्रहाचे शानदार प्रकाशन करण्यात आले. मुंबईत नुकत्याच झालेल्या या कार्यक्रमात शिक्षणतज्ञ महादेव रानडे, कवी अशोक बागवे, सतिश सोळांकूरकर, अरुण म्हात्रे, सनदी अधिकारी हर्षवर्धन जाधव, साहित्यिक डॉ. माधव अभ्यंकर, पत्रकार अशोक शिंदे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
शारदा प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. सामाजिक क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या प्रा. पाटील यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. यातील कथा सत्य घटनांवर आधारित आहेत. पुस्तक विक्रीतून येणारे सर्व पैसे गरीब विद्यार्थ्यांसाठी सर्वद फाउंडेशनला देणगी स्वरुपात दिले जाणार असल्याचे त्यांनी याप्रसंगी जाहीर केले.

