Homeकल्चर +आपत्काळात असा साजरा...

आपत्काळात असा साजरा करा श्रावणी सोमवार!

यावर्षी ‘श्रावणी सोमवार’ हे व्रत  9, 16, 23, 30 ऑगस्ट आणि 6 सप्टेंबर या दिवशी केले जाईल. श्रावण मासातील सोमवारी शिवाच्या मंदिरात जाऊन शिवपिंडीला अभिषेक घालण्याचा प्रघात आहे. यंदाही कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर श्रावणी सोमवारचे व्रत नेहमीप्रमाणे करण्यास काही ठिकाणी मर्यादा असू शकतात. सनातन संस्थेद्वारा संकलित या लेखात आपत्काळातील (कोरोनाच्या संकटकाळातील) निर्बंधांमध्ये जेथे घराबाहेर पडून शिवालयात जाणे शक्य नाही, त्यांनी ‘आपद्धर्मा’चा भाग म्हणून घरी राहूनच हे व्रत कशाप्रकारे अंगीकारावे, याविषयी लेखात धर्मशास्त्राधारित विवेचन करण्यात आले आहे.

1. श्रावण सोमवारी उपवास करून शिवाची विधीवत् पूजा करणे

उपोषितः शुचिर्भूत्वा सोमवारे जितेन्द्रियः।

वैदिकैर्लौकिकैर्मन्त्रैर्विधिवत्पूजयेच्छिवम्।।

– ग्रंथ व्रत राज

अर्थ: संयम आणि शुचिर्भूतपणा आदी नियमांचे पालन करत सोमवारी उपवास करून वैदिक अथवा लौकिक मंत्राने शिवाची विधीवत् पूजा करावी.

सोमवार

शास्त्रकारांनी मनावर संयम ठेवून, शुचिर्भूतपणादी नियम पाळण्याविषयी, तसेच उपवास करण्याविषयी सांगितले आहे. त्याचप्रमाणे आपापल्या ज्ञानाच्या आधारे शक्य असेल, त्या वैदिक अथवा लौकिक मंत्रांद्वारे शिवाची पूजा करायला सांगितली आहे.

2. शिवाची पूजा कशी करावी?

अ. आपल्या घरातील शिवलिंगाची पूजा करावी.

आ. शिवलिंग उपलब्ध नसेल, तर शिवाच्या चित्राची पूजा करावी.

इ. शिवाचे चित्रसुद्धा उपलब्ध नसेल, तर पाटावर शिवलिंगाचे किंवा शिवाचे चित्र काढून त्याची पूजा करावी.

ई. वरीलपैकी काहीही शक्य नसेल, तर शिवाचा ‘ॐ नमः शिवाय।’ हा नाममंत्र लिहूनही त्याची आपण पूजा करू शकतो.

सोमवार

3. शिवामूठ व्रत   

विवाहानंतर पहिली पाच वर्षे श्रावण सोमवारी शिवामूठ व्रत केले जाते. श्रावण मासात येणार्‍या चार सोमवारी ४ प्रकारचे धान्य शिवाला अर्पण केले जाते. विवाहानंतरची पहिली पाच वर्षे क्रमवार हे व्रत केले जाते. यात श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी एकभुक्त राहून शिवलिंगाची पूजा करावी आणि क्रमाने तांदूळ, तीळ, मूग, जवस आणि सातू (पाचवा सोमवार आल्यास त्यादिवशी) या धान्याच्या पाच मुठी देवावर वाहाव्या.

Continue reading

उद्या परशुराम जयंती!

अग्रतश्‍चतुरो वेदा: पृष्ठत: सशरं धनु:। इदं ब्राह्मम् इदं क्षात्रं शापादपि शरादपि॥ अर्थ: चारही वेद मुखोद्गत करून आहेत ब्राह्मतेज जोपासणारा व क्षात्रतेजाची खूण म्हणून पाठीवर धनुष्यबाण बाळगणारा भगवान परशुराम विरोधकांना शापाने अथवा शस्त्राने हरवील. भगवान परशुरामांच्या अतुलनीय गुणवैशिष्ट्यांची ओळख या एका श्लोकावरून होते. श्रीविष्णूचा सहावे अवतार परशुराम उपास्यदेवता...

देवीमाहात्म्य!

शाक्त संप्रदाय: भारतामध्ये विविध संप्रदाय कार्यरत आहेत. या संप्रदायांनुसार संबंधित देवतेची उपासना प्रचलित आहे. गाणपत्य, शैव, वैष्णव, सौर्य, दत्त आदी संप्रदायांप्रमाणे शाक्त संप्रदायाचे अस्तित्त्वही पुष्कळ प्राचीन काळापासून भारतामध्ये आहे. शाक्त संप्रदायाने सांगितल्याप्रमाणे शक्ती उपासना करणारे अनेक शाक्त भारतात सर्वत्र...

नवरात्रीत देवीने धारण केलेली नऊ रूपे!

‘युगानुयुगे नवरात्रीचे व्रत करण्यात येते. या 9 दिवसांत देवीच्या 9 रूपांची पूजा करण्यात येते. नवरात्रीच्या निमित्ताने आपण या देवीच्या 9 रूपांचा महिमा जाणून घेणार आहोत. नवरात्रीचे व्रत म्हणजे आदिशक्तीची उपासना होय देवीच्या 9 रूपांविषयी आज आपण या लेखातून जाणून...
Skip to content