Homeकल्चर +एनएफएआयला मिळाला तेलगू...

एनएफएआयला मिळाला तेलगू चित्रपटांच्या स्लाइड्सचा दुर्मिळ खजिना!

राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या (एनएफएआय) चित्रपट खजिन्यात मोलाची आणखी भर पडली आहे. 450पेक्षा अधिक काचेच्या स्लाइड्स या खजिन्यात सामावल्या आहेत. चित्रपटसृष्टीच्या अगदी सुरुवातीच्या काळातील या चित्रफिती असून ह्या दुर्मिळ स्लाइड्स सिनेमाच्या प्रारंभ युगाची साक्ष देणाऱ्या ठरल्या आहेत.

दोन पातळ काचांच्या मध्ये चित्रफीत पॉझिटिव्ह दाबून या काचा तयार केल्या जात असत. एखादा नवा सिनेमा येणार असेल, तर त्याची घोषणा करण्यासाठी, जाहिरात करण्यासाठी या स्लाइड्सचा वापर होत असे. सिनेमाच्या मध्यंतरात किंवा चित्रपट सुरू होण्यापूर्वी थिएटरमध्ये या स्लाइड्स दाखवल्या जात असत.

“या ग्लास स्लाइड्स म्हणजे भारतीय चित्रपट परंपरेचा वैभवशाली दस्तावेज आहे. आमच्या चित्रपट संग्रहात हा खजिना जतन करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे” अशी प्रतिक्रिया एनएफएआयचे संचालक प्रकाश मगदूम यांनी दिली. आज वेगाने बदलत असलेल्या  तंत्रज्ञानाच्या काळात हा ऐतिहासिक खजिना एवढ्या मोठ्या प्रमाणात सापडणे अतिशय दुर्मिळ आणि महत्त्वाचा शोध म्हणता येईल.

ज्या फिल्म पॉझिटिव्ह, या स्लाइड्स तयार करण्यासाठी वापरल्या जात, त्या चित्रपटाच्या पोस्टर किंवा इतर प्रचार/जाहिरातीचेच लघुरुप असे.

या महत्त्वाच्या खजिन्याबद्दल प्रतिक्रिया देताना, एनएफएआयच्या दस्तऐवज विभागाच्या प्रभारी आरती कारखानीस म्हणाल्या की, “या ग्लास स्लाइड्स आपल्याला त्या प्रारंभीच्या काळातील तेलगू चित्रपट सृष्टीच्या जाहिरात कलेचे विहंगावलोकन घडवणाऱ्या आहेत. चित्रपटसृष्टीचे संशोधन करणाऱ्या लोकांसाठी हा एक महत्त्वाचा संदर्भ आहे. आम्ही लवकरच हे डिजिटल स्वरूपातही आणू.”

चित्रपट संग्राहलयाला मिळालेल्या खजिन्यात, अनेक महत्त्वाच्या चित्रपटांच्या ग्लास स्लाइड्स आहेत. यात व्ही व्ही राव यांचा, विधवा पुनर्विवाहावर आधारित गाजलेला सामाजिक चित्रपट ‘मल्ली पेल्ली’ (1939), बी एन रेड्डी यांचा ‘वंदे मातरम’ (1939), यात चित्तोड व्ही नागय्या अभिनित ‘किलु गुरर्म’ (1949), एन टी रामाराव यांचा ‘दासी’ (1952), शरदचंद्र चटटोपाध्याय यांच्या गाजलेल्या देवदास चित्रपटाची तेलगू आवृत्ती, राघवय्या यांचा ‘देवदासु’ (1953) यासारख्या अनेक उत्तमोत्तम 70 तेलगू चित्रपटांच्या स्लाइड्स यात आहेत. सुमारे 1939 ते 1955 या काळातील हे चित्रपट आहेत.

सध्या एनएफएआयच्या संग्रहालयात, हिंदी, गुजराती आणि तेलगू भाषेतील 2000पेक्षा अधिक काचेच्या स्लाइड्स आहेत.

Continue reading

सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी पुण्यात विशेष पासपोर्ट मोहीम

नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर नियोजित वेळ मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पासपोर्ट उपलब्द व्हावा म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, 'सामान्य' आणि 'तत्काळ' श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातल्या 'प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट...

15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2022-23!

घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले...

नवी मुंबईतले ‘एपीएमसी’ पोहोचले राष्ट्रीय स्तरावर!

राज्याच्या कृषी आणि पणन क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रशासकीय बदल झाला असून, नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)ला आता अधिकृतरीत्या 'राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार' (एमएनआय - मार्केट ऑफ नॅशनल इंपॉर्टन्स) म्हणून घोषित करण्यात आले आहे....
Skip to content