Homeहेल्थ इज वेल्थमुख्यमंत्री फडणवीसांच्या विशेषाधिकारामुळे...

मुख्यमंत्री फडणवीसांच्या विशेषाधिकारामुळे चिमुकलीवर झाली सर्जरी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामार्फत नाशिकमधल्या नऊ वर्षांच्या चिमुकलीवर कॉक्लियर इम्प्लांट सर्जरी नुकतीच यशस्वीरित्या पूर्ण झाली. यासाठी मुख्यमंत्री कक्षातून दीड लाखांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. कक्षामार्फत ९ महिने ते २ वर्षं वय असलेल्या बालकांनाच या उपचारासाठी निधी दिला जातो. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून रुग्णावर यशस्वीरित्या उपचार झाले आहेत.

रुग्णाचे वडील कंत्राटी पद्धतीने एका खाजगी कंपनीत कामाला आहेत. आई गृहिणी असून मोठी बहीण पदवीधर आहे. घरची परिस्थिती अत्यंत बेताची असून उपचारासाठी लागणारी रक्कम रुग्णाच्या कुटुंबीयांसाठी फार मोठी होती. कक्षाने केलेल्या मदतीमुळे आज माझ्या मुलीवर उपचार होऊ शकले. उद्या ती ऐकू शकेल, बोलू शकेल ही बाब आमच्यासाठी फार मोठी आहे. मुलीच्या जन्मापासून तिनेही सर्वसामान्य मुलांप्रमाणे आयुष्य जगावे असे वाटायचे. परंतु तिची स्थिती पाहून मनाला हळहळ वाटायची. आज तिच्यावर उपचार झाले असताना ती लवकरच सर्वसामान्यांसारखे जीवन जगू शकेल असा विश्वास वाटतो. या सहकार्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच कक्षाचे मनस्वी आभार, अशा शब्दात रुग्णाच्या नातेवाईकांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. राज्यातील प्रत्येक आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णाला मदत देण्यासाठी, त्यांच्या कठीण काळात त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहण्यासाठी कक्ष प्रयत्नशील आहे. हे करत असताना काही तांत्रिक बाबी आल्यास त्या शिथिल केल्या जातील आणि रुग्णाच्या उपचारांना प्राधान्य देण्यात येईल असे कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले.

Continue reading

सुहास खामकरचा ‘राजवीर’ ८ ऑगस्टला चित्रपटगृहात!

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या सुप्रसिद्ध बॉडीबिल्डर सुहास खामकर यांची प्रमुख भूमिका असलेला "राजवीर" हा हिंदी चित्रपट येत्या ८ ऑगस्टला संपूर्ण भारतात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. बलदंड व्यक्तिमत्त्व असलेल्या सुहास खामकरच्या रुपानं हिंदी चित्रपटसृष्टीला नवा नायक या चित्रपटाच्या...

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...
Skip to content