Homeमुंबई स्पेशलस्वतःऐवजी देशाचा विचार...

स्वतःऐवजी देशाचा विचार सर्वप्रथम करा!

आपल्या देशात भय आणि भ्रष्टाचारमुक्त राजकारण योग्य पद्धतीने अंगिकारण्यात आले आणि स्वतःऐवजी देश सर्वप्रथम, असा विचार सर्वच लोकप्रतिनिधींनी केला तर विश्वभरात भारताला महासत्ता होण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही, असे प्रतिपादन जीवनविद्या मिशनचे आजीव विश्वस्त प्रल्हाददादा पै यांनी केले.

ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी यांनी लिहिलेल्या ‘गुरुजी’ या पुस्तकाचे प्रकाशन मुंबईतल्या बोरीवली येथील जीवनविद्या मिशनच्या मुख्य कार्यालयात प्रल्हाददादा पै यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

प्रल्हाददादा पै यांनी देशातील संपूर्ण राजकारणात भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त वातावरण कसे निर्माण होईल, यासाठी जीवनविद्या मिशनचे प्रणेते सद्गुरु वामनराव पै यांचा सिद्धांत, त्यांचे तत्त्वज्ञान किती समर्पक आणि चपखलपणे योग्य आहे ते समजावून सांगितले.

सद्गुरुंनी सर्वात आधी देश आपल्या डोळ्यासमोर अग्रस्थानी ठेवला. देशाचे भले झाले तर आपोआप आपले भले होईल. आपण जे कार्य करतो हे देशासाठी समजून करावे. देशाचे भले करणे हेच उद्दिष्ट समोर ठेवणे आवश्यक आहे. ‘नेशन फर्स्ट’ ही संकल्पना पुढे न्यायला हवी. देश सुधारला, देशाची प्रगती झाली तर पर्यायाने आपली प्रगती निश्चितच होईल. देश आणि समाज आपण नेहमीच आपल्या डोळ्यासमोर ठेवला पाहिजे, समाजाशी आपली बांधिलकी आहे आणि समाजाची प्रगती म्हणजे पर्यायाने देशाचीच प्रगती, देश, समाज जर पुढे गेला तर आपणही पुढे जाऊ शकतो, असे ते म्हणाले.

मी, नको आम्ही पण नको तर ‘सर्व ‘ हे महत्त्वाचे आहे, सर्वांमध्ये आपणही आलोच. जीवनविद्या मिशनच्या विश्वप्रार्थनेमध्ये सर्वांचे भले चिंतले आहे. सर्वांच्या भल्यात आपलेही भले आहे. निवडणुकीच्या राजकारणावर कटाक्ष टाकताना प्रल्हाददादा पै म्हणाले की, आपण पक्षाच्या चिन्हावर मतदान करतो. पक्षाला निवडून देतो. मग अशावेळी जर एखाद्या लोकप्रतिनिधीने पक्ष सोडला तर त्याची निवड रद्दबातल करण्यात आली पाहिजे आणि त्या लोकप्रतिनिधीच्या जागी पक्षाने दुसऱ्या योग्य व्यक्तीला नियुक्त केले पाहिजे, ‘नॉमिनेट’ केले पाहिजे. म्हणजे मग पक्षांतराला आळा बसू शकेल. पक्ष हाच महत्त्वाचा असल्याने पक्षाने दुसऱ्या योग्य व्यक्तीची नियुक्ती केली तर खर्चसुद्धा वाचू शकेल. भ्रष्टाचार या प्रवृत्तीला आळा बसू शकेल. लोकशाहीच्या चारही स्तंभांनी प्रामाणिकपणे, जबाबदारीने कार्यरत राहून देश हाच केंद्रबिंदू मानून देशाच्या विकासाचा दृष्टिकोन बाळगला तर भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त वातावरण देशात निर्माण होण्यास चालना मिळेल, असेही ते म्हणाले.

यावेळी योगेश वसंत त्रिवेदी, ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य, ‘आहुति’चे संपादक गिरीश वसंत त्रिवेदी, कार्यकारी संपादिका मनीषा त्रिवेदी, जीवनविद्या मिशनचे विश्वस्त सचिव दीपक काळे, प्रा. नयना रेगे, राजा शिवछत्रपती परिवारच्या मुंबई संपर्क प्रमुख रेखाताई बोऱ्हाडे तसेच त्रिवेदी कुटुंबीय यावेळी उपस्थित होते.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content