Homeमुंबई स्पेशलसव्वा लाख वितरकांना...

सव्वा लाख वितरकांना कमाईची संधी!

भारतीय उद्योग क्षेत्रातील लाखो लोकांना कोव्हिड-१९ महामारीमुळे नोकरीवरून कपात आणि आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला. या ग्रासलेल्या यंत्रणेला बळ देण्यासाठी देशातील आघाडीच्या बी2बी ऑनलाईन मार्केटप्लेस प्लॅटफॉर्म, ट्रेडइंडिया, आता आपले सब-व्हेंचर गेटडिस्ट्रिब्युटर्स डॉट कॉमसोबत आणखी एक फ्लॅगशिप ट्रेड इव्हेंट ‘इंडियन बिझनेस डिस्ट्रीब्युटरशिप एक्सपो २०२१’चे आयोजन करत आहे.

११-१३ ऑगस्टदरम्यान हे आयोजन होणार आहे, जेणेकरून १.२५ लाखांहून अधिक वितरकांसाठी २००+ ब्रँड आणि हजारो उत्पादनांशी जोडून कमाईच्या आशादायी संधी वाढतील. ट्रेडइंडिया आणि गेटडिस्ट्रिब्युटर डॉट कॉम हे देशभरातील वितरकांना एक सहज व्हर्चुअल प्लॅटफॉर्म प्रदान करत आहे. त्यामुळे त्यांना स्वत:च्या घरातून किंवा वैयक्तिक जागेवरून उपयुक्त ब्रँडसोबत डिजिटल पद्धतीने जोडण्यास मदत मिळू शकेल. अशाप्रकारे त्यांचा वेळ आणि प्रवासाचा खर्च वाचेल. ही संपूर्णत: डिजिटल व्हर्चुअल परिषद सध्याच्या कठीण काळात उपयुक्त अशा बिझनेस संधी देण्यास मदत करेल.

यासोबतच, या आयोजनाद्वारे सर्व सहभागींना अनेक महत्त्वपूर्ण लाभ मिळतील. जसे की, आकर्षक सेवा आणि सुविधायुक्त डिजिटल स्टॉल मिळतील. या आयोजनात १५,०००पेक्षा जास्त गुंतवणूकदार सहभागी होण्याची आशा आहे. तसेच 90%पेक्षा जास्त लोकांनी आधीपासूनच आपल्या पसंतीनुसार रजिस्ट्रेशन केले आहे.

ट्रेडइंडियाचे सीईओ संदीप छेत्री म्हणाले की, ही महामारी भारतीय बिझनेस कम्युनिटीसाठी खूप आव्हानात्मक ठरली आहे आणि त्यातही उभे आपण उभे आहोत, याचा आम्हाला अभिमान आहे. उद्योग क्षेत्राला महामारीच्या धक्क्यातून सावरण्यात मदतीकरिता ट्रेडइंडियाने तिच्या सब व्हेंचर गेटडिस्ट्रिब्युटर्स डॉट कॉमसोबत या उल्लेखनीय व्हर्चुअल प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. त्यामुळे असंख्य डिस्ट्रिब्युटर्सना योग्य ब्रँडशी जोडण्यात मदत होईल. तसेच त्यांना अखिल भारतीय स्तरावर कमाईच्या पुरेशा संधी प्रदान केल्या जातील. आम्हाला विश्वास आहे की, या आयोजनाद्वारे आकर्षक संधी आणि देशातील सर्व बिझनेस यंत्रणेकरिता नव्या नेतृत्त्वासंदर्भात एक मोठे यशस्वी कार्य पार पडेल.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content