Homeचिट चॅटआयडियलतर्फे १६ वर्षांखालील...

आयडियलतर्फे १६ वर्षांखालील विनाशुल्क कॅरम स्पर्धा १६ मार्चला

मुंबईच्या आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे १६ वर्षांखालील शालेय मुलामुलींची विनाशुल्क कॅरम स्पर्धा १६ मार्च रोजी आयोजित करण्यात आली आहे. आनंदराव अडसूळ चॅरीटेबल ट्रस्ट व सिबिईयु सहकार्याने ही स्पर्धा दादर-पश्चिम येथील सिबिईयु सभागृहात रंगणार आहे. पहिल्या ८ विजेत्या-उपविजेत्यांना आकर्षक चषकासह स्ट्रायकर पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती संयोजक लीलाधर चव्हाण यांनी दिली. यावेळी खेळाडूंना तज्ञांचे मोफत मार्गदर्शनदेखील लाभणार आहे.

ही स्पर्धा चँम्पियन कॅरम बोर्डवर बाद पद्धतीने होईल. प्रत्येक फेरीसाठी चार बोर्डची मर्यादा राहील. आनंदराव अडसूळ चॅरीटेबल ट्रस्टतर्फे यंदापासून क्रीडा क्षेत्रात विविध उपक्रम राबविण्यात येणार असून एप्रिलमध्ये सबज्युनियर कॅरमपटूना प्रोत्साहन देण्यासाठी सुपर लीग कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. सदर स्पर्धेतील उदयोन्मुख खेळाडूंना तेथे संधी लाभणार आहे. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या संबंधित शालेय खेळाडूंनी प्रवेशअर्जासाठी अथवा अधिक माहितीसाठी संघटन समितीचे प्रमोद पार्टे अथवा चंद्रकांत करंगुटकर (९९८७८ ३१६२२) यांच्याकडे २ मार्चपर्यंत संपर्क साधावा.  

Continue reading

प्री आणि पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी 31 जानेवारीपर्यंत करा अर्ज

मुंबई शहर जिल्ह्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी प्री-मॅट्रिक (इ. 9वी व 10वी) व पोस्ट-मॅट्रिक (इ. 11वी ते पदव्युत्तर / व्यावसायिक अभ्यासक्रम) शिष्यवृत्तीच्या लाभासाठी एनएसपी (नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर) येत्या 31 जानेवारीपर्यंत सादर करावेत, असे इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, मुंबई शहरचे सहाय्यक संचालक रविकिरण पाटील यांनी कळविले आहे. केंद्र...

मकर संक्रांत म्हणजे काय?

मकर संक्रात या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. भारतीय संस्कृतीत हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक जीव ‘तीळगूळ घ्या, गोड बोला’ असे म्हणून जवळ येतो. हा सण तिथीवाचक नाही. मकर संक्रांतीचा...

कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञानाची माहिती

देशातील अव्वल बायोडायव्हर्सिटी आणि विविध पिकांची उत्पादनक्षमता असलेल्या नंदुरबार जिल्हा व परिसरातील कष्टाळू व प्रयोगशील शेतकऱ्यांना शहादा येथे नुकत्याच झालेल्या ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनासारख्या आयोजनातून नवतंत्रज्ञानाचे उपयुक्त मार्गदर्शन मिळते. त्याचा उपयोग करून नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक गट क्रांती...
Skip to content