Tuesday, March 11, 2025
Homeडेली पल्सआयएसआय मार्क नसलेली...

आयएसआय मार्क नसलेली खेळणी जप्त!

बीआयएस म्हणजेच भारतीय मानक ब्युरोच्या मुंबई शाखेने भिवंडीतल्या बेबी कार्ट कंपनीच्या गोदामावर छापा घालून आयएसआय मार्क नसलेली 367 इलेक्ट्रिकल आणि नॉन-इलेक्ट्रिकल खेळणी जप्त केली.

ही खेळणी वैध आयएसआय  प्रमाणन चिन्हांशिवाय साठवण्यात आली होती आणि ती विकलीही जात होती. प्रमाणित नसलेल्या खेळण्यांची विक्री करणे  म्हणजे, खेळणी गुणवत्ता नियंत्रण आदेश, 2020 आणि बीआयएस कायदा, 2016च्या कलम 17चे उल्लंघन आहे. बीआयएस कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल कंपनीविरुद्ध फौजदारी तक्रार दाखल केली जाईल.

याव्यतिरिक्त, अशा बनावट उत्पादनांच्या विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या ई-कॉमर्स वेबसाइटवर कारवाई केली जाईल. बीआयएस कायद्यानुसार, उल्लंघन करणाऱ्यांना पहिल्या गुन्ह्यासाठी दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि/किंवा किमान दोन लाख रुपयांचा दंड होऊ शकतो. त्यानंतरच्या उल्लंघनासाठी दंड पाच लाख रुपये किंवा त्याहून अधिक वाढू शकतो. तसेच  संबंधित वस्तूंच्या किंमतीच्या दहापट दंडदेखील न्यायालयाकडून आकारला जाऊ शकतो.

ग्राहकांनी कोणतीही खरेदी करण्यापूर्वी उत्पादनांच्या बीआयएस  प्रमाणन दर्जाविषयी पडताळणी करावी. बीआयएस केअर ऍप वापरकर्त्यांना कोणत्याही उत्पादनाच्या परवानाची स्थिती तपासण्याची परवानगी असते. जर परवाना निलंबित, स्थगित किंवा कालबाह्य आढळला तर ग्राहक ऍपद्वारे तक्रारी दाखल करू शकतात. जर बीआयएस मानक चिन्हांचा (आयएसआय मार्क, हॉलमार्क आणि बीआयएस नोंदणी चिन्हांसह) गैरवापर केल्याचे लक्षात आल्यास, लोकांनी ईमेल, पत्र किंवा बीआयएस केअर ऍपद्वारे तक्रार करण्याचे आवाहनही बीएसआयने केले आहे. बीएसआयचे ऍप्लिकेशन गुगल प्ले स्टोअर आणि ऍपल स्टोअरवर डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. तक्रारदाराने दिलेली सर्व माहिती गोपनीय ठेवली जाते.

Continue reading

कुर्ल्यातल्या कबड्डी स्पर्धेत अंबिका, पंढरीनाथ संघांची बाजी

शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून मुंबईतल्या कुर्ला (पश्चिम) येथील गांधी मैदानात जय शंकर चौक क्रीडा मंडळ आणि गौरीशंकर क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित पुरुष गटाच्या कबड्डी स्पर्धेत प्रथम श्रेणी गटात अंबिका सेवा मंडळ, कुर्ला...

‘स्वामी समर्थ श्री’साठी राज्यातील दिग्गज उद्या आमनेसामने

क्रीडा क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या "स्वामी समर्थ श्री" राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेच्या माध्यमातून मुंबईकर शरीरसौष्ठवप्रेमींना जानदार, शानदार आणि पीळदार शरीरसौष्ठवपटूंचे ग्लॅमर पाहायला मिळणार आहे. आमदार महेश सावंत यांच्या आयोजनाखाली मुंबईच्या प्रभादेवीत दै. सामना मार्गाशेजारील...

भारतात महिलांच्या आत्महत्त्यांपैकी ३६.६% तरुणींच्या!

पुरुषांपेक्षा महिलांमध्ये चिंता आणि नैराश्य अधिक प्रमाणात असून जागतिक स्तरावर ही समस्या अधिक व्यापक आहे, असा अहवाल नीरजा बिर्ला यांच्या नेतृत्त्वाखालील आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या एमपॉवर, या अभ्यास गटाने प्रसिद्ध केला आहे. भारतात पुरुषांपेक्षा हे प्रमाण दुप्पट असून यात...
Skip to content