Homeमुंबई स्पेशलमुंबईच्या के/पूर्व विभागात...

मुंबईच्या के/पूर्व विभागात उद्यापासून असहाय्यांचे लसीकरण

जे नागरिक आजारपणासह शारीरिक / वैद्यकीय कारणांनी अंथरूणास खिळून आहेत, अशा व्यक्तींचे कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण करण्याची कार्यवाही मुंबईच्या के/पूर्व प्रभागापासून प्रायोगिक तत्त्वावर उद्या, शुक्रवार, ३० जुलै रोजी सुरू होणार आहे.

यासाठी प्रोजेक्ट मुंबई, या बिगर शासकीय सेवाभावी संस्थेचेदेखील मुंबई महापालिकेला सहकार्य लाभणार आहे. आजारपणासह शारीरिक / वैद्यकीय कारणांनी अंथरूणास खिळून आहेत, अशा नागरिकांना लसीकरण केंद्रांवर येणे शक्य होत नाही. त्यांची अडचण लक्षात घेता, अशा व्यक्तींना त्यांच्या घरीच जाऊन कोविड प्रतिबंधक लस देण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार ही मोहीम चालू करण्यात येत आहे.

महाराष्ट्र शासनानेदेखील संपूर्ण राज्यात स्थानिक प्राधिकरणांना यासंदर्भात नागरिकांकडून माहिती संकलित करुन कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. या अनुषंगाने, ज्यांच्या घरात अंथरुणास खिळून असणारे (bedridden) व्यक्ती आहेत व ज्यांना अशा व्यक्तीचे कोविड प्रतिबंधक लसीकरण करुन घ्यावयाचे आहे, अशा व्यक्तींची नावे, वय, पत्ता, संपर्क क्रमांक, अंथरुणास खिळून असण्याचे कारण इत्यादी माहिती covidvacc2bedridden@gmail.com या ईमेल आयडीवर मागविण्यात आली आहे. मुंबई महापालिकेला आतापर्यंत ४ हजार ४६६ व्यक्तींची नावे प्राप्त झाली आहेत.

अंथरुणास खिळलेल्या व्यक्तिंचे लसीकरण करण्यासंदर्भात राज्य शासनाने काही प्राथमिक मार्गदर्शक तत्त्वंदेखील निश्चित केली आहेत. ज्यांचे लसीकरण करावयाचे आहे, अशी व्यक्ती पुढील किमान ६ महिने अंथरुणास खिळून राहणार असल्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासह लस घेण्यासाठी अशा व्यक्तींचे संमतीपत्र संबंधित व्यक्ती/नातेवाईक यांनी प्रशासनाला सादर करणे आवश्यक असेल. तसेच, अशा व्यक्तींना कोवॅक्सिन ही लस देण्याचे निर्देश तज्ज्ञांच्या समितीने दिले असून त्यानुसार कोवॅक्सिन ही लस देण्यात येईल.

तज्ज्ञ व्यक्तींच्या उपस्थितीत लसीकरण करुन त्याबाबत विहित आवश्यक ती सर्व प्रक्रिया पाळण्यात येईल. प्रायोगिक तत्त्वावरील लसीकरण सुरू झाल्यानंतर, कोणकोणत्या बाबी अशा कार्यवाहीमध्ये समाविष्ट कराव्या लागतील, याचा विचार करुन पुढील टप्पा हाती घेण्यात येणार आहे, असे मुंबई महापालिकेकडून सांगण्यात आले.

Continue reading

श्री मावळी मंडळ कबड्डीः स्वराज्य स्पोर्ट्स, श्रीराम क्रीडा विश्वस्त अजिंक्य

महिलांत स्वराज्य स्पोर्टस् आणि पुरुषांत श्रीराम क्रीडा विश्वस्त यांनी ठाण्याच्या श्री मावळी मंडळाने आयोजित केलेल्या ७३व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद मिळविले. स्वराज्य स्पोर्ट्सची याशिका पुजारी व श्रीराम क्रीडा विश्वस्तचा तुषार शिंदे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले. दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी रोख...

‘आठवणीतले बाळासाहेब’ व्याख्यानाने होणार जय महाराष्ट्र नगर व्याख्यानमालेचा शुभारंभ

यंदाचे वर्ष हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे असे आवाहन केले आहे. ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांनी ४४ वर्षांपूर्वी मुंबईच्या...

संपात उतरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई!

विविध प्रलंबित मागण्यांसाठी उद्या म्हणजेच २१ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारण्याबाबत राज्य सरकारी, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी शासनास नोटीस दिली असून, या पार्श्वभूमीवर या संपामध्ये सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा शासनाने दिला आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, राज्य सरकारी गट‑ड (चतुर्थ श्रेणी)...
Skip to content