Thursday, January 30, 2025
Homeचिट चॅटएमआरव्हीसीच्या अध्यक्षपदी विलास...

एमआरव्हीसीच्या अध्यक्षपदी विलास वाडेकर

मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे (एमआरव्हीसी) नवे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) म्हणून विलास वाडेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते येत्या 31 जानेवारीला सेवानिवृत्त होत असलेल्या सुभाष चंद गुप्ता यांची जागा घेणार आहेत. सध्या वाडेकर एमआरव्हीसीमध्ये संचालक (तांत्रिक) या पदावर कार्यरत आहेत. ते भारतीय रेल्वे अभियांत्रिकी सेवेच्या (आयआरएसई) 1991च्या तुकडीतील अधिकारी आहेत.

वाडेकर यांनी अमरावती विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये प्रथम क्रमांक मिळवला असून सर्व शाखांमध्ये अव्वल येत तीन सुवर्णपदके मिळवली आहेत. त्यांनी स्थापत्य-संरचना अभियांत्रिकीमध्ये प्रथम श्रेणीतील विशेष गुणांसह पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. त्यांना भारतीय रेल्वे आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये तीन दशके काम करण्याचा व्यापक अनुभव आहे. त्यांनी प्रकल्प नियोजन, अंमलबजावणी, संचालन आणि प्रशासकीय कार्यांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. 2019मध्ये वाडेकर यांची केंद्र सरकारच्या संयुक्त सचिवपदी नियुक्ती झाली. याद्वारे त्यांचे तांत्रिक कौशल्य आणि नेतृत्त्वक्षमता अधोरेखित झाली. मुंबई उपनगरीय रेल्वे प्रकल्पांमध्ये त्यांचा 15 वर्षांहून अधिक अनुभव आहे.

वाडेकर यांच्या नेतृत्वाखालील महत्त्वाचे प्रकल्प:

ठाणे-दिवा पाचवी आणि सहावी रेल्वे मार्गिका.

उधना-जळगाव दुहेरीकरण आणि विद्युतीकरण.

एमयूटीपी-III: विरार-डहाणू चौपदरीकरण व बोरिवली-विरार पाचवी व सहावी मार्गिका प्रकल्पांसाठी नियोजन, आरेखन व मान्यता मिळवणे, तसेच वनविभागाची मंजुरी मिळवणे.

अनधिकृत प्रवेश नियंत्रण कार्य.

तुर्भे-नेरुळ ट्रान्स हार्बर लाईन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

आंतर को-ऑप. बँक बुद्धिबळ: मानस सावंत विजेता   

को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन, मुंबईतर्फे विमा कामगार को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड प्रायोजित आंतर को-ऑपरेटिव्ह बँक बुद्धिबळ स्पर्धा प्रथम मानांकित म्युनिसिपल बँकेच्या मानस सावंतने सलग दुसऱ्यांदा जिंकली. एमएससी बँकेच्या आदित्य जोशीविरुध्द मानस सावंतने हत्ती व वजिराच्या सहाय्याने आक्रमक चाली रचल्या आणि नवव्या...

प्रजासत्ताकदिन संचलनात जम्मू-काश्मीर रायफल्स सर्वोत्तम

राजधानी दिल्लीत नुकत्याच झालेल्या प्रजासत्ताकदिन संचलनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संचलन पथक आणि चित्ररथांचे निकाल जाहीर करण्यात आले असून जम्मू आणि काश्मीर रायफल्सच्या संचलन पथकाला सर्वोत्तम पथकाचा मान देण्यात आला आहे. सेवा आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल / इतर पूरक दलांचे...

आयएसआय मार्क नसलेली खेळणी जप्त!

बीआयएस म्हणजेच भारतीय मानक ब्युरोच्या मुंबई शाखेने भिवंडीतल्या बेबी कार्ट कंपनीच्या गोदामावर छापा घालून आयएसआय मार्क नसलेली 367 इलेक्ट्रिकल आणि नॉन-इलेक्ट्रिकल खेळणी जप्त केली. ही खेळणी वैध आयएसआय  प्रमाणन चिन्हांशिवाय साठवण्यात आली होती आणि ती विकलीही जात होती. प्रमाणित नसलेल्या...
Skip to content