10 ते 14 फेब्रुवारीदरम्यान बेंगळूरुमध्ये ‘एअरो इंडिया’!

“द रनवे टू बिलियन ऑपॉर्च्युनिटीज”, या संकल्पनेवर आधारीत एअरो इंडिया 2025, या आशियातल्या सर्वात मोठ्या एअरो शोच्या 15व्या आवृत्तीचे आयोजन येत्या 10 ते 14 फेब्रुवारीदरम्यान कर्नाटकातल्या बेंगळुरूमधल्या येलहांका हवाईतळावर होणार आहे.

हा कार्यक्रम परदेशी आणि भारतीय कंपन्यांमधल्या भागीदारीला चालना देण्यासाठी आणि स्वदेशीकरणाच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी जागतिक मूल्यसाखळीतील नवीन दालने शोधण्याचा एक मंच उपलब्ध करेल. या कार्यक्रमातले पहिले तीन दिवस (10,11 आणि 12) व्यवसायसंबंधित असतील तर 13 आणि 14 तारखेला सर्वसामान्य जनतेला हा शो पाहण्याची संधी मिळेल. या कार्यक्रमात हवाई प्रात्यक्षिके आणि हवाई क्षेत्रातल्या व्यापक संरक्षण मंचाचे एका जागी मांडलेले प्रदर्शन यांचा समावेश असेल. या कार्यक्रमाचे पूर्वावलोकन, उद्घाटन समारंभ, संरक्षणमंत्र्यांचा परिसंवाद, सीईओंची गोलमेज चर्चा, मंथन स्टार्ट-अप कार्यक्रम, श्वास रोखून धरायला लावणारी हवाई प्रात्यक्षिके, इंडिया पॅव्हेलियनचा समावेश असलेले एक विशाल प्रदर्शन आणि एरोस्पेस कंपन्यांचा व्यापारमेळा असा भरगच्च उपक्रमांचा समावेश असलेला हा कार्यक्रम आहे.

मित्र देशांसोबत संरक्षणविषयक धोरणात्मक भागिदारीसंदर्भात संवाद निर्माण करण्यासाठी, ‘BRIDGE – बिल्डिंग रेझिलिअन्स थ्रू इंटरनॅशनल डिफेन्स अँड ग्लोबल एन्गेजमेंट’ या विषयावर एका परिसंवादाचे यजमानपददेखील भारत भूषविणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने संरक्षणमंत्री, संरक्षण राज्यमंत्री, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ स्तरावर विविध द्विपक्षीय बैठकांचेदेखील नियोजन करण्यात आले आहे. मित्र देशांसोबतची भागीदारी पुढील स्तरावर नेण्यासाठी नव्या दालनांचा शोध घेऊन त्यांच्यासोबतच्या संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रातल्या संबंधांना बळकटी देण्यावर यामध्ये भर देण्यात येईल.

Continue reading

पंतप्रधान मोदी सेशेल्सच्या सर्वोच्च बहुमानाने सन्मानित

व्हिक्टोरिया (सेशेल्स) येथे एका विशेष सोहळ्यात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज सेशेल्सचे अध्यक्ष डॉ. पॅट्रिक हर्मिनी यांच्या हस्ते ‘गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन’ हा पहिला सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. पंतप्रधानांच्या पर्यावरणपूरक नेतृत्त्वासाठी, विकसनशील देशांच्या हितासाठी केलेले प्रयत्न, सागरी...

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...
Skip to content