Homeन्यूज ॲट अ ग्लांसउत्तर प्रदेशात एन्काऊंटरचे...

उत्तर प्रदेशात एन्काऊंटरचे सत्र सुरूच!

उत्तर प्रदेशमध्ये संशयित आरोपीचा एन्काऊंटर (पोलीस चकमक) करण्याचे सत्र अजूनही चालूच आहे. आज बेहराईचमधल्या रामगोपाल मिश्रा यांच्या हत्त्येतल्या दोघा संशयित आरोपींबरोबर पोलिसांची चकमक झाली. त्यात सर्फराज आणि तालीब, हे दोन आरोपी जखमी झाल्याचे समजते. गेल्या ७ वर्षांत उत्तर प्रदेशात १२ हजार ९६४ म्हणजेच जवळजवळ १३ हजार पोलीस चकमकी झाल्या आहेत. त्यात २०७ नामचीन गुंड मारले गेले तर १७ पोलिसांचा बळी गेला आहे.

13 ऑक्टोबरला दुर्गामातेच्या विसर्जनाच्या मिरवणुकीत झालेल्या हिंसाचारात रामगोपाल मिश्रा यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्त्या प्रकरणातील सर्वच्या सर्व पाच आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आहेत. या प्रकरणातला एक आरोपी काल पोलिसांच्या ताब्यात आला. त्यानंतर आज पोलिसांनी उत्तर प्रदेशातून नेपाळला पळून जात असलेल्या चार आरोपींना पकडले.

या आरोपींना बसहरी नहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोठ्या कालव्याजवळ रोखण्यात आले. पोलिसांनी हटकताच आरोपींनी पोलिसांवर गोळ्या झाडल्या. त्यानंतर पोलिसांनी स्वरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात दोन आरोपी जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. एकाच्या डाव्या तर दुसऱ्याच्या उजव्या पायात गोळ्या घुसल्या आहेत. या दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे बहराईचच्या पोलीस अधीक्षक वृंदा शुक्ला यांनी माध्यमांना सांगितले.

दरम्यान, आरोपी सर्फराजची बहीण रूख्सार यांनी ही चकमक बनावट असल्याचा आरोप केला ाहे. पोलिसांनी कालच आपल्या भावाला घरातून पकडून नेले होते. त्यामुळे आज तो नेपाळला पळून जाण्याच्या प्रयत्नात कसा असू शकतो, असा सवाल माध्यमांकडे केला.

Continue reading

राज्यपाल आचार्य देवव्रत मुंबईत

महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारण्यासाठी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे आज, रविवारी मुंबईत सपत्नीक आगमन झाले. अहमदाबाद येथून तेजस एक्स्प्रेसने आलेल्या राज्यपालांचे तसेच त्यांच्या पत्नी दर्शनादेवी यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल...

मुंबईत रिपब्लिकन पक्षाचा उपमहापौर!

येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीची सत्ता आल्यास रिपब्लिकन पक्षाला उपमहापौरपद निश्चित मिळेल. रिपब्लिकन पक्षाला उत्तर मुंबई जिल्ह्यात किमान 7 जागा आणि संपूर्ण मुंबईत किमान 24 जागा महायुतीने सोडाव्यात असा प्रस्ताव भारतीय जनता पार्टीकडे देण्यात यावा. त्यातील काही जागा रिपब्लिकन पक्ष...

काँग्रेसची मंत्रालयासमोरची जागा परस्पर आरबीआयच्या घशात!

काँग्रेससह विविध राजकीय पक्षांची नरीमन पाईंट भागातील कार्यालयांचे मेट्रोच्या कामासाठी सरकारच्या विनंतीवरून तात्पुरते स्थलांतर करण्यात आले होते. मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचजागी काँग्रेससह सर्व कार्यालये नव्याने बांधून देण्याचे आश्वासन मेट्रो कार्पोरेशनने दिले होते. पण आता मात्र काँग्रेस पक्षाला अंधारात...
Skip to content