Homeटॉप स्टोरीपरकीय गुंतवणुकीत महाराष्ट्राची...

परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्राची बाजी!

गेले दोन वर्षं सातत्याने परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक 1वर असलेल्या महाराष्ट्रात 2024-2025, या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतसुद्धा सर्वाधिक गुंतवणूक आली आहे. एप्रिल ते जून 2024 या पहिल्या तिमाहीत एकूण 70,795 कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. थोडक्यात सांगायचे तर या तिमाहीत देशात आलेली एकूण गुंतवणूक ही 1,34,959 कोटी रुपये इतकी असून, त्यापैकी 70,795 कोटी अर्थात 52.46 टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परकीय गुंतवणुकीवर विशेष लक्ष केंद्रीत केले असून ही बातमीही त्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेशी शेअर केली आहे.

परकीय

देशात दुसर्‍या क्रमांकावर कर्नाटक (19,059 कोटी), तिसर्‍या क्रमांकावर दिल्ली (10,788 कोटी), चौथ्या क्रमांकावर तेलंगणा (9023 कोटी), पाचव्या क्रमांकावर गुजरात (8508 कोटी), सहाव्या क्रमांकावर तामिळनाडू (8325 कोटी), सातव्या क्रमांकावर हरयाणा (5818 कोटी), आठव्या क्रमांकावर उत्तर प्रदेश (370 कोटी), नवव्या क्रमांकावर राजस्थान (311 कोटी) असून या सर्वांच्या बेरजेपेक्षाही अधिक गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे.

यापूर्वी 2022-23मध्ये महाराष्ट्रात 1,18,422 कोटी (कर्नाटक, दिल्ली, गुजरात यांच्या एकत्रित बेरजेपेक्षा अधिक) तर 2023-24मध्ये महाराष्ट्रात 1,25,101 कोटी (गुजरातपेक्षा दुपटीहून अधिक आणि गुजरात आणि कर्नाटक यांच्या बेरजेहून अधिक) गुंतवणूक आली होती.

Continue reading

फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न

फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन मंगळवारी सीरियाच्या दमास्कस दौऱ्यावर होते. या दौऱ्यात ते सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या भेटीकरीता निघाल्यानंतर ते उतरलेल्या हॉटेलच्या जवळ दोन बॉम्बस्फोट झाले. हे स्फोट मॅक्रॉन यांच्यावरील अयशस्वी हल्ला असल्याचे मानले जात आहे. असद राजवट पडल्यानंतर सीरियाला भेट देणारे...

वाहू लागला मुंबईकरांची तहान भागवणारा पहिला तलाव!

मुंबई महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी आणि मुंबईतच असणाऱ्या दोन तलावांपैकी एक पालिकेचा ‘विहार’ तलाव आज, ७ जुलैला रात्री ९ वाजता ओसंडून वाहू लागला आहे‌. हा तलाव गेल्या वर्षी १८ ऑगस्टला पूर्ण भरुन वाहू लागला होता. सन १८५९मध्ये...

रेल्वे कामगारांचे नेते विकास गुप्ते यांचे निधन

महाराष्ट्र हिंद मजदूर सभेचे खजिनदार, वेस्टर्न रेल्वे एम्प्लॉईज युनियनचे खजिनदार तसेच मणिबेन कारा फाउंडेशनचे डेप्युटी डायरेक्टर विकास गुप्ते यांचे आज, ६ जुलै २०२६ रोजी वयाच्या ६५व्या वर्षी कल्याण येथील रेल्वे हॉस्पिटलमध्ये अल्पशा आजाराने निधन झाले. ते शेवटच्या श्वासापर्यंत कामगार...
Skip to content