Homeचिट चॅटश्री गणेश आखाड्याच्या...

श्री गणेश आखाड्याच्या कुस्तीपटूंचे यश

श्री गणेश आखाड्यामध्ये क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य तथा जिल्हा क्रीडा परिषद ठाणे व मिरा भाईंदर महानगर पालिका आयोजित २०२४-२५च्या जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत यजमान श्री गणेश आखाड्याच्या कुस्तीपटूंनी शानदार यश संपादन केले. त्यांच्या पेहेलवानांनी एकूण २७ पदके मिळवली. त्यामध्ये १५ सुवर्ण, ८ रौप्य, ४ कांस्य पदकांचा समावेश आहे.

पदकविजेत्या कुस्तीपटूंना वस्ताद वसंतराव पाटील, वैभव माने, कोमल देसाई यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. प्रथम क्रमांक मिळवलेले १५ पेहेलवान विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या क्रीडा अधिकारी दिपाली जोशी, मिरा भाईंदर क्रीडा विभाग समन्वयक जेरविन अल्मेडिया उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बलराज बागल यांनी केले.

स्पर्धेतील पदक विजेते-

सुवर्ण- प्रतिक बोबडे, शिवांश जालुई, दक्ष चौधरी, प्रिया गुप्ता, तनुजा मांढरे, लकी अडबल्ले, ओम जाधव, कविता राजभर, स्नेहा गुप्ता, सुप्रिया गुप्ता, मनस्वी राऊत, आदर्श शिंदे, कोमल पटे, डॉली गुप्ता.

रौप्य- साईनाथ गायकवाड, शिवम गिरी, युवराज माली, पृथ्वीराज बोबडे, अमर खंडारे, विकी बॉइनवाड, साई गवळी.

कांस्य- आदर्श काटकर, महावीर गुप्ता, बालाजी पवार, महेश ढगे.

Continue reading

मुख्यमंत्र्यांना राजीनामा देण्यास भाग पाडणारे पत्रकार अभय मोकाशींचे निधन

इंग्रजी पत्रकारितेत आपल्या शोधपत्रकारितेचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ पत्रकार अभय मोकाशी यांचे काल, शनिवारी रात्री उशिरा मुंबईतल्या बोरीवली पूर्व येथील श्रीकृष्ण नगरातील डॉ. अनिता मयेकर यांच्या माऊली इस्पितळात निधन झाले. वयाच्या ६९व्या वर्षात पदार्पण करण्यास जेमतेम एक तास उरला असताना...

अवघ्या दोन तासांतच गुंतवणूकदारांचे ९ लाख कोटी मातीमोल!

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी गुरुवारचा दिवस उजाडताच अत्यंत पडझडीचा ठरला आहे. कच्च्या तेलाच्या भडकलेल्या किमती आणि जागतिक अस्थिरतेमुळे भारतीय शेअर बाजारात सकाळी ९ वाजल्यापासूनच 'भूकंप'सदृश स्थिती पाहायला मिळाली. सुरुवातीच्या अवघ्या दोन तासांच्या व्यवहारात गुंतवणूकदारांचे सुमारे ९ लाख कोटी रुपये मातीमोल झाले....

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग ‘वेपिंग’ करताना कॅमेऱ्यात कैद!

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)च्या चालू हंगामात राजस्थान रॉयल्सने मैदानावर उत्कृष्ट कामगिरी करत विजय मिळवला असला, तरी सध्या चर्चा मात्र त्यांच्या विजयाची नाही, तर कर्णधार रियान परागच्या एका वादग्रस्त कृत्याची होत आहे. ड्रेसिंग रूममध्ये बसलेला असताना रियान पराग 'वेपिंग' (ई-सिगारेटचा...
Skip to content