Homeचिट चॅटश्री समर्थ व्यायाम...

श्री समर्थ व्यायाम मंदिराचे अॅथलेट चमकले

मुंबई शहर जिल्हा ज्युनियरआणि २३ वर्षांखालील वार्षिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२४ या स्पर्धेत दादरच्या श्री समर्थ व्यायाम मंदिराच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. त्यांच्या खेळाडूंनी ४ सुवर्ण, २ रौप्य, १ कांस्य पदक मिळवले.

२० वर्षांखालील गटात ईशान मेंडिसने १०० मीटर धावणे आणि २०० मीटर धावणे शर्यतीत अनुक्रमे सुवर्ण, रौप्य पदकाची कमाई केली. १८ वर्षांखालील गटात मुलींमध्ये सारा राणेने सुवर्ण तर आर्यन सवणेने कांस्य पदक मिळवले. १६ वर्षांखालील गटात सूरज सरोजने आणि १४ वर्षांखालील गटात कृष्णाली सुर्वेने भालाफेकमध्ये सुवर्ण पदकाचा मान मिळवला. १४ वर्षांखालील गटात शौर्य पडवळने ट्रायथलॉनमध्ये  रौप्य पदक पटकावले.

लांब उडीत उत्कृष्ट कामगिरीसाठी सारा राणे हिला सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. पदक विजेत्या खेळाडूंना प्रशिक्षक सुनील सवने यांचे मार्गदर्शन लाभले.

1 COMMENT

Comments are closed.

Continue reading

नवज्योत सिंग सिद्धूची भाजपमध्ये घरवापसी?

पंजाबच्या राजकारणात मोठ्या फेरबदलाची चिन्हे असून माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू पुन्हा एकदा भाजपमध्ये परतण्याची शक्यता वर्तवली जात आहे. २०२७च्या पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने खास 'मास्टरप्लॅन' तयार केला असून, आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेनंतर...

अजिंक्यतारा मल्लखांब स्पर्धेत सुविद्या, समता, मुंबादेवी संघ चमकले!

मुंबईत मल्लखांब लव संघ, सुविद्या प्रसारक संघ आणि आर्किटेक्चर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने बोरीवली (पश्चिम) येथे "५वी अजिंक्यतारा मल्लखांब चषक स्पर्धा" उत्साही वातावरणात नुकतीच संपन्न झाली. ही स्पर्धा मल्लखांब खेळातील अनभिषिक्त सम्राट दत्ताराम दुदम यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात येते....

आता ‘बापूजी’ही सोडणार ‘तारक मेहता..’?

छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय आणि गेल्या १६ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (टीएमकेओसी) पुन्हा एकदा वादाच्या आणि चर्चेच्या भोवऱ्यात सापडली आहे. मालिकेतील सर्वात महत्त्वाचे पात्र 'बापूजी' म्हणजेच चंपकलाल जयंतीलाल गडा यांची भूमिका साकारणारे अभिनेते...
Skip to content