Homeडेली पल्सविधानसभा निवडणुकीसाठी 'वंचित'ला...

विधानसभा निवडणुकीसाठी ‘वंचित’ला गॅस सिलेंडर!

केंद्रीय निवडणूक आयोगाने आगामी विधानसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला वंचित न ठेवता संपूर्ण निवडणुकीसाठी गॅस सिलेंडर, हे चिन्ह दिले आहे.

लोकसभा निवडणुकीत मात्र निवडणूक आयोगाने एकाच निवडणुकीत तीन वेगवेगळी चिन्हे वंचित बहुजन आघाडीला दिली होती. १९ एप्रिलला झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी वंचितला लोकसभेच्या पाचपैकी चार मतदारसंघांत तीन वेगवेगळी निवडणूक चिन्हे मिळाली होती. रामटेक आणि गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात गॅस सिलिंडर, भंडारा लोकसभा मतदारसंघात उसाची मोळी घेतलेला शेतकरी तर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात रोड रोलर या निवडणूक चिन्हावर वंचितचे उमेदवार लढले होते.

वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी नवी दिल्लीत निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन लोकसभा निवडणुकीसाठी गॅस सिलिंडर, शिट्टी किंवा रोड रोलर यापैकी एक निवडणूक चिन्ह मिळावे, अशी मागणी केली होती. मात्र, निवडणूक आयोगाने ‘वंचित’ला एकच निवडणूक चिन्ह दिले नव्हते. मात्र, विधानसभा निवडणुकीसाठी आयोगाने वंचितला गॅस सिलेंडर, हे चिन्ह दिले आहे.

Continue reading

गोविंद येतयेकर व ओम प्रकाश चौहान प्रदेश भाजपाचे माध्यम व सहमाध्यमप्रमुख

भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशचे माध्यमप्रमुख म्हणून काल गोविंद येतयेकर यांची तर सहमाध्यममुख म्हणून ओम प्रकाश चौहान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईत गोविंद येतयेकर व ओम प्रकाश चौहान यांना संघटनात्मक नियुक्तीचे पत्र...

उद्यापासून आनंद घ्या संगीतनाट्य महोत्सवाचा!

संगीतनाटकांची परंपरा कायम ठेवण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने उद्यापासून म्हणजेच १० ते १२ एप्रिल, या कालावधीत तीन दिवसांच्या संगीतनाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात या नाटकांचे दररोज सायंकाळी ५.३० वाजता सादरीकरण...

अखेर इराणपुढे अमेरिकेने हात टेकले! युद्धविराम!! शुक्रवारी पाकिस्तानात चर्चा!!!

४८ तासांत होर्मूझची सामुद्रधुनी खुली केली नाही तर इराण बेचिराख करू, असा अत्यंत गंभीर इशारा देणाऱ्या अमेरिकेने अखेर इराणपुढे हात टेकले. इराणच्या १० अटींच्या प्रस्तावावर सकारात्मक चर्चा करण्याचे मान्य करत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन आठवड्यांकरीता एकतर्फी युद्धविराम...
Skip to content