Monday, December 23, 2024
Homeएनसर्कल'ओमेगा'ची पॅरिस २०२४...

‘ओमेगा’ची पॅरिस २०२४ ब्रॉन्झ गोल्ड एडिशन लाँच!

कोणत्याही क्रीडा प्रकारातील यशाचे मोजमाप म्हणजे गोल्ड, सिल्व्हर आणि ब्रॉन्झ पदक. पॅरिस २०२४ ऑलिंपिकचा अधिकृत टाइमकीपर, ओमेगाने ऑलिंपिक खेळांमध्ये मिळणाऱ्या या प्रतिष्ठित पदकांच्या सन्मानार्थ एका खास घड्याळाचे अनावरण केले आहे.

या ओमेगा पॅरिस २०२४ ब्रॉन्झ गोल्ड एडिशनमध्ये एकाच संग्राह्य डिझाईनमध्ये उपरोक्त तिन्ही प्रतिष्ठित धातूंचा उपयोग केला आहे. या घड्याळाची ३९ मिमिची केस ओमेगाच्या खास ब्रॉन्झ गोल्डने बनवली आहे. यातील चमकदार डायल एजी ९२५ सिल्व्हरची बनलेली आहे तर, घड्याळाचे नाजूक हात १८ के सेडना गोल्डचे बनलेले आहेत, ज्यावर खास पीव्हीडी ब्रॉन्झ गोल्डचा मुलामा चढवला आहे. हे डिझाईन जागतिक स्तरावर ओमेगा ज्या क्रीडा सिद्धीशी निगडीत आहे, त्यास समर्पित आहे.

ओमेगा

पॅरिस २०२४ ब्रॉन्झ गोल्ड एडिशनचा व्हिंटेज लुक १९३९च्या ओमेगाच्या एका क्लासिक मनगटी घड्याळातून प्रेरित आहे. तो काळ म्हणजे या ब्रॅंडचा टाइमकीपिंगचा सुरुवातीचा काळ होता. त्या घड्याळात ओमेगाचे प्रसिद्ध ३ ओटी मॅन्युअल-वाइंडिंग स्मॉल सेकंड्स कॅलिबर होते आणि त्यातील धातू व केसच्या आकाराबाबत तांत्रिक शीट्सवर संदर्भ “सीके ८५९” अंकित केले होते.

ती परंपरा चालू ठेवत, पॅरिस २०२४ला आदरांजली वाहणाऱ्या या घड्याळात केसच्या मागे ‘बीजी ८५९’ असे कोरले आहे, जे ब्रॉन्झ गोल्डमध्ये केसच्या आकाराचे प्रतीक आहे. सौम्य गुलाबी छटा असलेला आणि व्हर्डिग्रीस-ऑक्सिडेशन होऊ न देता बेजोड गंजप्रतिरोध करणारा ब्रॉन्झ गोल्ड हा ओमेगाचा स्वतःचा मिश्रधातू आहे, जो ९के हॉलमार्कचे ३७.५% सोने तसेच पॅलडियम आणि चांदीसारख्या उत्कृष्ट घटकांनी समृद्ध आहे. ही उत्कृष्ट आणि अद्वितीय निर्मिती या घड्याळाला आगळावेगळा लूक देते.

या घड्याळाचे अन्य उल्लेखनीय फीचर म्हणजे घड्याळाच्या डायलच्या केंद्रस्थानी असलेली ‘क्लास द पॅरिस’ची पॅटर्न, जी फ्रेंच कलाकुसरीमधून स्फुरली आहे. ती बारीक आणि मोहक सजावटीचे अस्सल प्रतीक आहे. आणखी बारकाव्यात शिरून ओमेगाने मिनिट ट्रॅकवर एक गोलाकार ब्रश्ड पॅटर्न दिली आहे आणि ६ वाजण्याच्या स्थानी छोटा सेकंड्स सबडायल ट्रॅक दिला आहे. गडद ग्रे रंगाचा ओमेगा लोगो हा ब्रॅंडच्या पारंपरिक शैलीत सादर केला आहे. तसेच, कोरलेले ‘बीजी ८५९’ आणि केसबॅकला एका मुद्रित आणि फ्रॉस्टेड ऑलिंपिक गेम्स पॅरिस २०२४ पदकाने सुशोभित केले आहे.

पॅरिस २०२४ ब्रॉन्झ गोल्ड एडिशन, हे घडयाळ मनगटावर तपकिरी रंगाच्या काफ-स्किन लेदर पट्ट्यासह बांधले जाते. या पट्ट्याला एक सँडब्लास्टेड ब्रॉन्झ गोल्ड बक्कल आहे, ज्यावर पॉझिटिव्ह रिलीफमधला पॉलिश केलेला व्हिंटेज ओमेगा लोगो आहे. असाच व्हिंटेज लोगो या घड्याळाच्या क्राऊनवर नक्षीच्या रूपात दिसतो.

ही घड्याळ बनवणारी स्विस कंपनी १९३२पासून ऑलिंपिक गेम्सची अधिकृत टाइमकीपर आहे आणि इतिहासात ३१व्यांदा ऑलिंपिकमध्ये वेळेचे मोजमाप करण्यासाठी आता या उन्हाळ्यात ती पॅरिसमध्ये येऊन दाखल झाली आहे. हीच परंपरा पॅरालिंपिक गेम्समध्येदेखील चालू आहे. पॅरालिंपिक गेम्समध्ये हा ब्रॅंड १९९२पासून अधिकृत टाइमकीपर आहे.

Continue reading

कर्तबगार अधिकाऱ्याची सत्यकथा ‘आता थांबायचं नाय’!

बृहन्मुंबई महानगरपालिका, आशियामधील सर्वात श्रीमंत समजली जाणारी भारतातील मानाची महानगरपालिका, याच महापालिकेच्या सहकार्याने आणि प्रेरणेने तयार होत आहे, 'झी स्टुडिओज'चा आगामी मराठी चित्रपट, 'आता थांबायचं नाय'! 'झी स्टुडिओज', 'चॉक अँड चीज' आणि 'फिल्म जॅझ' प्रॉडक्शनची एकत्र निर्मिती असलेल्या 'आता थांबायचं...

परभणीतील सूर्यवंशी मृत्यूप्रकरणीही न्यायालयीन चौकशी

परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी न्यायालयीन चौकशी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. संविधानाच्या प्रतिकृतीच्या कथित विटंबनेवरून परभणीमध्ये १० डिसेंबरला हिंसाचार उसळला होता आणि त्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू ओढवला होता. विधानसभेत या विषयावर गेले दोन...

सन्मित्र क्रीडा मंडळ अजिंक्य

मुंबईत कांदिवली येथे झालेल्या मुंबई उपनगर कबड्डी संघटनेच्या ४२व्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत पूर्व विभागाच्या द्वितीय श्रेणी पुरुष गटात सन्मित्र क्रीडा मंडळ, घाटकोपरने जेतेपद पटकावले. अंतिम फेरीत सन्मित्रने साई स्पोर्ट्स क्लब, भांडूप यांच्यावर ७ गुणांनी विजय मिळवला. सन्मित्र...
Skip to content