Wednesday, July 3, 2024
Homeहेल्थ इज वेल्थपारंपरिक औषधांसाठी एनआयआयएमएच...

पारंपरिक औषधांसाठी एनआयआयएमएच ठरले डब्ल्यूएचओचे पहिले सहयोग केंद्र

पारंपरिक औषधांमधील संशोधनासाठीचे सहयोग केंद्र म्हणून हैदराबादच्या सीसीआरएएस-एनआयआयएमएचला जागतिक आरोग्य संघटनेची (डब्ल्यूएचओ) मान्यता मिळाली आहे. त्यामुळे पारंपरिक औषधांमधील मूलभूत आणि साहित्यिक संशोधनासाठी एनआयआयएमएच हे जागतिक आरोग्य संघटनेचे पहिले सहयोग केंद्र ठरले आहे. ही प्रतिष्ठेची मान्यता 3 जून 2024पासून चार वर्षांच्या कालावधीसाठी देण्यात आली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) हैदराबाद येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मेडिकल हेरिटेज (एनआयआयएमएच), अर्थात राष्ट्रीय भारतीय वैद्यकीय वारसा संस्थेला आयुष मंत्रालयाच्या केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदेअंतर्गत (सीसीआरएएस) एक केंद्र म्हणून “पारंपरिक औषधांबाबत मूलभूत आणि साहित्यिक संशोधनासाठीचे” जागतिक आरोग्य संघटनेचे सहयोग केंद्र म्हणून नुकतेच नियुक्त केले आहे.

1956मध्ये स्थापन झालेली एनआयआयएमएच, हैदराबाद ही संस्था, भारतातील आयुर्वेद, योग, निसर्गोपचार, युनानी, सिद्ध, सोवा-रिग्पा, होमिओपॅथी,बायोमेडिसिन (जैव-वैद्यकशास्त्र) आणि इतर संबंधित आरोग्यसेवा शाखांमधील वैद्यकीय-ऐतिहासिक संशोधनाचे दस्तऐवजीकरण आणि प्रदर्शन करण्यासाठी समर्पित असलेली एकमेवाद्वितीय संस्था आहे. सीसीआरएएस, एनआयआयएमएचचे महासंचालक आणि डब्ल्यूएचओ-सीसीचे प्रमुख प्रा. वैद्य रवीनारायण आचार्य यांच्या सक्षम नेतृत्त्वाखाली सातत्यपूर्ण आणि समर्पित प्रयत्नांनी संस्थेने हा उल्लेखनीय टप्पा गाठला आहे.

भारतात बायोमेडिसिन आणि संबंधित विज्ञानांच्या विविध शाखांमध्ये सुमारे 58 डब्ल्यूएचओ सहयोग केंद्रे आहेत. उल्लेखनीय म्हणजे, इन्स्टिट्यूट फॉर टीचिंग अँड रिसर्च इन आयुर्वेद, जामनगर आणि मोरारजी देसाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ योगा, नवी दिल्ली, या संस्थांच्या पाठोपाठ पारंपरिक औषधांच्या क्षेत्रातील तिसरे डब्ल्यूएचओ सहयोग केंद्र म्हणून सीसीआरएएस-एनआयआयएमएच, हैदराबाद, या केंद्राची भर पडली आहे.

“पारंपरिक औषधांबाबत मूलभूत आणि साहित्यिक संशोधना”साठीचे पहिले डब्ल्यूएचओ सहयोग केंद्र म्हणून एनआयआयएमएच, आयुर्वेद, युनानी, सिद्ध आणि सोवा-रिग्पा शाखेमधील शब्दावलीचे मानकीकरण तसेच रोगांचे आंतरराष्ट्रीय वर्गीकरणाच्या अकराव्या आवृत्तीसाठी पारंपरिक औषध मॉड्यूल-IIचे अद्ययावतीकरण करण्यासाठी, डब्ल्यूएचओला सहाय्य करेल. याव्यतिरिक्त, डब्ल्यूएचओ सहयोग केंद्र पारंपरिक औषधांसाठी संशोधनपद्धती विकसित करण्यामध्ये सदस्य देशांना सहाय्य करेल.

“पारंपारिक औषधांबाबत मूलभूत आणि साहित्यिक संशोधनासाठी” डब्ल्यूएचओ सहयोग केंद्राचे संचालन सीसीआरएएसचे महासंचालक प्रा. वैद्य रवीनारायण आचार्य यांच्या नेतृत्त्वाखालील समर्पित पथक करेल. यामध्ये डॉ. जी. पी. प्रसाद, सहायक संचालक I/c आणि युनिट प्रमुख, वैद्य साकेत राम त्रिगुल्ला, संशोधन अधिकारी (आयुर्वेद) आणि डॉ. संतोष माने, संशोधन अधिकारी (आयुर्वेद), एनआयआयएमएच, हैदराबाद यांचा तसेच सीसीआरएएस मुख्यालयाच्या साहित्यिक आणि मूलभूत संशोधन पथकाचा समावेश असेल.

Continue reading

एजंटशी संगनमतः पासपोर्ट खात्यातल्या 14 जणांविरूद्ध गुन्हे

पासपोर्टसाठी अपुरी वा बोगस कागदपत्रे वापरण्यासाठी एजंट वा दलालांबरोबर संगनमत साधल्याच्या प्रकरणी मुंबईतल्या लोअर परळ तसेच मालाडच्या पासपोर्ट ऑफिसमधल्या 14 अधिकाऱ्यांविरूद्ध दाखल केल्यानंतर सीबीआयने आता या प्रकरणात साधारण दीड कोटींची रोकड जप्त केली आहे. परराष्ट्र मंत्रालयांतर्गत मुंबईतील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाच्या लोअर...

राष्ट्रीय पुरस्कारासाठी शिक्षकांना 15 जुलैपर्यंत संधी

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2024साठी पात्र शिक्षकांकडून ऑनलाईन स्व-नामांकन 27 जून 2024पासून शिक्षण मंत्रालयाच्या http://nationalawardstoteachers.education.gov.in या पोर्टलवर मागविण्यास सुरूवात झाली असून ऑनलाईन स्व-नामांकन पाठवण्याची अंतिम तारीख 15 जुलै 2024 आहे. यावर्षी जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर तीन टप्प्यातील निवड प्रक्रियेद्वारे 50 शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड केली जाईल. राष्ट्रपतींच्या हस्ते येत्या शिक्षकदिनी 5 सप्टेंबर 2024 रोजी विज्ञान...

संयुक्त सरावासाठी भारतीय सैन्य दल थायलंडला

संयुक्त लष्करी सराव 'मैत्री'च्या 13व्या सत्रात भाग घेण्यासाठी भारतीय सैन्य दल नुकतेच थायलंडला रवाना झाले. हा संयुक्त लष्करी सराव थायलंडच्या टाक प्रांतातील वाचिराप्राकन फोर्ट येथे 1 ते 15 जुलैदरम्यान आयोजित करण्यात आला आहे. याआधी सप्टेंबर 2019मध्ये मेघालयमधील उमरोई येथे अशाप्रकाचा संयुक्त सराव झाला होता. भारतीय सैन्य...
error: Content is protected !!