Homeमुंबई स्पेशलबुधवारी अंधेरी-गोरेगाव परिसरात...

बुधवारी अंधेरी-गोरेगाव परिसरात पाणीपुरवठा विस्कळीत!

मुंबई महापालिकेकडून येत्या बुधवारपासून म्हणजेच २२ मेपासून गुरूवारी, २३ मेच्या मध्यरात्री उशिरापर्यंत जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम करण्यात येणार असल्यामुळे अंधेरी-गोरेगाव परिसरातील काही भागात या काळात पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे पालिकेने जाहीर केले आहे.

मुंबई महापालिकेतर्फे के पूर्व विभागात अंधेरी (पूर्व) येथील बी. डी. सावंत मार्ग व कार्डिनल ग्रेसिअस मार्ग जंक्शन ते कार्डिनल ग्रेसिअस मार्ग व सहार मार्ग जंक्शन येथे प्रत्येकी १५०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी आणि नवीन १२०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी (पार्ले आऊटलेट) या दोन मुख्य जलवाहिन्या जोडण्याचे व जुनी नादुरुस्त १२०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी काढून टाकण्याचे  काम बुधवारी सकाळी ९ वाजल्यापासून गुरुवारी मध्यरात्री १ वाजेपर्यंत (१६ तास) हाती घेण्यात येणार आहे.

हे काम पूर्ण झाल्यानंतर वेरावली जलाशय १, २, ३ ची पाण्याची पातळी सुधारेल व त्यामुळे अंधेरी (पूर्व) व (पश्चिम), जोगेश्वरी (पूर्व) व (पश्चिम), विलेपार्ले (पूर्व) व (पश्चिम) या भागांच्या पाणीपुरवठ्यामध्ये कायमस्वरुपी सुधारणा होणार आहे. या दुरुस्ती कालावधीत म्हणजे बुधवारी सकाळी ९ वाजल्यापासून गुरुवारी मध्यरात्री १ वाजेपर्यंत के पूर्व, के पश्चिम व पी दक्षिण विभागातील खालील भागात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.

के पूर्व विभाग- त्रिपाठी नगर, मुन्शी कॉलनी, बस्तीवाला कंपाऊंड, कलेक्टर कॉलनी मातोश्री क्लब, दुर्गा नगर (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सकाळी ८.०० ते सकाळी १०.००) – सकाळी ८.०० ते सकाळी ९.०० वाजेदरम्यान पाणीपुरवठा बंद राहील.

दुर्गा नगर, सारीपुत नगर (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सकाळी १०.०० ते दुपारी १२.००) – पाणीपुरवठा बंद राहील.

दत्त टेकडी, ओबेराय स्प्लेंडर, केलती पाडा, गणेश मंदीर परिसर जोगेश्वरी-विक्रोळी जोडरस्ता (JVLR) (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सकाळी ९.०० ते सकाळी ११.००) – पाणीपुरवठा बंद राहील.

बांद्रेकरवाडी, फ्रान्सिसवाडी, मखरानीपाडा, सुभाष मार्ग, चाचानगर (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सकाळी ११.०० ते दुपारी २.००) – पाणीपुरवठा बंद राहील.

पाणी

वांद्रे भूखंड, हरी नगर, शिवाजी नगर, पास्कल वसाहत, शंकरवाडी (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी १.३० ते दुपारी ३.४०) – पाणीपुरवठा बंद राहील.

विशाल सभागृह, वर्मा नगर, कामगार कल्याण, मांजरेकरवाडी, बिमा नगर, पंथकी बाग, तेली गल्ली, हाजी जुमान चाळ, कोळ डोंगरी, जीवा महाले मार्ग, साई वाडी, जीवन विकास केंद्र, शिवाजी नगर, संभाजी नगर, हनुमान नगर, श्रद्धानंद मार्ग, नेहरू मार्ग, तेजपाल मार्ग, शास्त्री नगर, आंबेडकर नगर, काजूवाडी, विलेपार्लेचा बहुतांश भाग (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ५.०० ते रात्री ८.००) – पाणीपुरवठा बंद राहील.

पंप हाउस, विजय राउत मार्ग, पाटीलवाडी, हंजर नगर, झगडापाडा, पारसी वसाहत, जिजामाता मार्ग, गुंदवली हिल, आशीर्वाद चाळ (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ५.०० ते रात्री ८.००) – पाणीपुरवठा बंद राहील.

जुना नागरदास मार्ग, मोगरपाडा, नवीन नागरदास मार्ग, पारसी पंचायत मार्ग, आर. के. सिंग मार्ग, निकोलसवाडी परिसर (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ रात्री ८.०० ते रात्री १०.३०) – पाणीपुरवठा बंद राहील.

पी दक्षिण विभाग– बिंबीसार नगर, बांद्रेकरवाडी, वनराई, राज्य राखीव पोलीस दल (SRPF) परिसर (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ७.०० ते रात्री ९.३०) – पाणीपुरवठा कमी दाबाने राहील.

राम मंदीर मार्ग, गोरेगाव (पश्चिम) (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ७.४५ ते रात्री ९.१५) – पाणीपुरवठा बंद राहील.

के पश्चिम विभाग– सी. डी. बर्फीवाला मार्ग, उपाश्रय गल्ली, स्वामी विवेकानंद मार्ग अंधेरी, दाऊद बाग, केव्हणी पाडा, धाकुशेठ पाडा, मालकम बाग, अंधेरी बाजार, भर्डावाडी, आंब्रे गार्डन पंप (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सकाळी ७.३० ते दुपारी १२.००) – पाणीपुरवठा बंद राहील.

जुहू-कोळीवाडा, जुहू तारा मार्ग (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सकाळी ९.०० ते सकाळी ११.०० जुहू-कोळीवाडा झोन के पश्चिम – ११) – पाणीपुरवठा बंद राहील.

देवराज चाळ, स्वामी विवेकानंद मार्ग (JVLR ते जोगेश्वरी बस आगार)  (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सकाळी ११.०० ते दुपारी १.०० एस. व्ही. मार्ग जोगेश्वरी भाग – २ – के पश्चिम ०१) – पाणीपुरवठा बंद राहील.

चार बंगला, डी. एन. नगर, जुहू-वेसावे जोडरस्ता (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी १२.१५ ते दुपारी २.१० चार बंगला झोन – के पश्चिम – ०७) – पाणीपुरवठा कमी दाबाने राहील.

विलेपार्ले (पश्चिम), लल्लूभाई पार्क, लोहिया नगर, विलेपार्ले गावठाण, मिलन सबवे, संपूर्ण जुहू परिसर, व्ही. एम. मार्ग, नेहरू नगर (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी २.३० ते सायंकाळी ४.३० विलेपार्ले झोन  – के पश्चिम ०९) – पाणीपुरवठा बंद राहील.

मोरागाव, जुहू गावठाण (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी २.३० ते सायंकाळी ४.४० मोरागाव झोन  – के पश्चिम ०८) – पाणीपुरवठा बंद राहील.

यादव नगर, सहकार मार्ग, बांदिवली हिल, मोमीन नगर, खजूरवाडी, जोगेश्वरी फाटक, जोगेश्वरी स्थानक मार्ग, कॅप्टन सामंत मार्ग (भाग) (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ रात्री ९.३० ते रात्री १२.०० यादव नगर  – के पश्चिम ०४) – पाणीपुरवठा बंद राहील.

गिल्बर्ट हिल, सागर सिटी, गावदेवी डोंगरी, जुहू गल्ली, वायरलेस मार्ग, श्रीनाथ नगर (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ रात्री १०.०० ते मध्यरात्री १२.३० गिल्बर्ट हिल झोन  – के पश्चिम ०६) – पाणीपुरवठा बंद राहील.

संबंधित परिसरातील नागरिकांनी पाणी जपून व काटकसरीने वापरावे. तसेच पाणीपुरवठा सुरळीत झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून ४ ते ५ दिवस पाणी गाळून व उकळून वापरावे, असे आवाहन पालिका प्रशासनातर्फे करण्‍यात आले आहे.  

Continue reading

विलेपार्ल्यात साकारतोय मुंबईतील पहिला शहरी शेतीप्रकल्प

मुंबईतल्या विलेपार्ले विधानसभा क्षेत्राचे भाजपा आमदार पराग अळवणी यांच्या संकल्पनेतून मुंबईतील पहिल्या शहरी शेती प्रकल्पाचे उद्घाटन महापौर रितू तावडे यांच्या उपस्थितीत होणार असून उपमहापौर संजय घडी आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे तसेच महापालिकेतील विविध समिती अध्यक्ष व अधिकारी यावेळी...

नारीवंदन राहिले! सीमांकन जिंकले!! मोदी आणि गांधी आता मैदानात आमनेसामने!!!

महिलांना लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत ३३ टक्के आरक्षण देणारे त्याचप्रमाणे यादृष्टीने मतदारसंघाची पुनरर्चना (सीमांकन) करणारी घटनादुरूस्ती विरोधकांच्या प्रबळ एकजुटीमुळे आज संध्याकाळी फेटाळली गेली. याकरीता झालेल्या मतदानात घटनादुरूस्तीसाठी लागणारे दोनतृतियांश बहुमत मिळवण्यात सरकार अपयशी ठरले. लोकसभेत उपस्थित असलेल्या एकूण ५२८...

युद्धविरामापर्यंत होर्मूझ पूर्णपणे खुले, इराणकडून घोषणा!

जगाच्या तेलवाहतूक तसेच इतर व्यापारात महत्त्वाची भूमिका बजावणारी होर्मूझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करण्याची घोषणा इराण सरकारने केली आहे. इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अरागची यांनी नुकतीच ही घोषणा केली. लेबनान आणि इस्त्रायलमध्ये झालेल्या युद्धविरामानंतर इराण सरकारने हा निर्णय घेतल्याचे...
Skip to content