Homeपब्लिक फिगरआज खऱ्या अर्थाने...

आज खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला नव्या पर्वाचा..

विजयाच्या जोशाने, मताधिक्याच्या त्वेषाने, प्रचंड संख्येने उसळलेल्या या जनसागराच्या उपस्थितीत आज माझ्या निवडणूक प्रचाराची सांगता सभा पार पडली. या सांगता सभेवर उपस्थित जनसमुदायाने अफाट जल्लोषात प्रेमाचा, पाठिंब्याचा जो वर्षाव केला, तो पाहता आज प्रचाराची सांगता जरूर झाली. मात्र खऱ्या अर्थाने प्रारंभ झालाय तो नव्या पर्वाचा, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीतल्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी काल व्यक्त केल्या.

बारामतीत या सभेसाठीची आजची गर्दी आणि या गर्दीचा जोश “न भूतो न भविष्यती” असाच होता. त्या जोशातून घुमणाऱ्या घोषणांनी आसमंत दणाणून गेला. माझ्या भाषणाला मिळालेला प्रतिसाद उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाषणावेळी टिपेला पोहोचला. आजची सभा अजितदादांनी अक्षरशः एकहाती जिंकली. या सभेचा उत्स्फूर्तपणे निर्माण झालेला उत्साही माहोल चेतना निर्माण करणारा, केवळ विजयाची नव्हे तर प्रचंड मताधिक्याची खात्री देणारा होता. ही खात्री देणाऱ्या तमाम मायबाप जनतेचे खूप खूप आभार, असेही त्या म्हणाल्या.

या सभेस राष्ट्रवादीसह महायुतीतील सर्वच घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते. शिवाय अनेक संघटना, संस्थांनी यावेळी जाहीर पाठींबा दिला. त्याबद्दल त्यांचेही आभार आणि मंगळवारी, ७ मे रोजी “घड्याळ” या चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड मताधिक्याने विजयी करावे, अशी विनंतीही सुनेत्रा पवार यांनी केली.

Continue reading

तुतीकोरिन बंदरात 5 कोटींचे चिनी फटाके जप्त!

दीपावलीपूर्वी फटाक्यांची बेकायदेशीर आयात रोखण्याच्या प्रयत्नात करण्यात आलेल्या कारवाईत, महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) 'ऑपरेशन फायर ट्रेल' या मोहिमेत, तुतीकोरिन बंदरात चाळीस फुटाचे दोन कंटेनर पकडले. या कंटेनरमध्ये 83,520 चिनी फटाके असल्याचे आढळून आले. अभियांत्रिकी वस्तू म्हणून ते पाठवण्यात येत होते. जप्त करण्यात आलेल्या मालाची...

महाराष्ट्रात भरदिवाळीत अवकाळी पावसाची शक्यता

भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) दिलेल्या माहितीनुसार, आग्नेय अरबी समुद्र आणि केरळ-कर्नाटक किनाऱ्यावरील लक्षद्वीप क्षेत्रात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे. पुढील 24 तासांत ते पश्चिम-वायव्येकडे म्हणजेच बंगालच्या उपसागरावर सरकण्याची आणि कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात...

मुंबईच्या समुद्रात लवकरच दिसणार कॅन्डेलाची बोट!

स्वीडनमध्ये जलवाहतुकीसाठी वापरण्यात येणारी पी १२ ही बोट लवकरच मुंबईत दाखल होणार असून, त्यामुळे राज्यातील जलवाहतुकीच्या क्षेत्रात आधुनिकतेचा नवा अध्याय सुरू होणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली. नितेश राणे नुकतेच स्वीडनच्या दौऱ्यावर...
Skip to content