Homeकल्चर +'मुड्स - Unpredictable'चे...

‘मुड्स – Unpredictable’चे पहिले पोस्टर लाँच!

नात्यातील काही प्रश्न अनुत्तरित राहिले. योग्यवेळी योग्य सुसंवाद झाला नाही तर त्या नात्यातील सुंदरता आपण गमावून बसतो. वेळप्रसंगी नात्यात टोकाचा दुरावा निर्माण होतो. विसंवादातून एखाद्या व्यक्तीचे जीवन नीरस होऊ शकते. अशाच एका नातेसंबंधांतील संवेदनशील विषयावर सकारात्मक भाष्य करणारा सायको थ्रीलर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘मुड्स – Unpredictable’ असे या आगामी मराठी चित्रपटाचे नाव असून या मराठी चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच पुण्यात लाँच झाले.

एस स्क्वेअर एन्टरटेनमेंट प्रस्तुत ‘मुड्स – Unpredictable’ या चित्रपटाच्या पोस्टर लाँचच्या वेळी चित्रपटाचे निर्माते संतोष चव्हाण, श्रावणी चव्हाण, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, चित्रपटांचे लेखक, दिग्दर्शक महेंद्र बोरकर, अभिनेता रितेश नगराळे आदी मान्यवर उपस्थित होते.

महेंद्र बोरकर यांचे या चित्रपटाच्या माध्यमातून चित्रपट दिग्दर्शक म्हणून पदार्पण होत असले तरी बोरकर मागील 20 वर्षांपासून मनोरंजन विश्वात कार्यरत आहेत. एकांकिका, प्रायोगिक रंगभूमी, व्यावसायिक नाटक तसेच विविध मालिकांचे लेखक, दिग्दर्शक म्हणून त्यांनी प्रेक्षकांची दाद मिळविली आहे.

आगामी ‘मुड्स – Unpredictable’ या चित्रपटाबद्दल बोलताना बोरकर म्हणाले की, आयुष्याला पॉझिटिव्ह एनर्जी देणारी ही कथा आहे. हल्ली आपण फार यांत्रिक म्हणजे रोबोटसारखे जीवन जगतोय. संवेदनशीलता हरवून चाललीय. कोणतेही नाते टिकण्यासाठी, फुलण्यासाठी संवाद खूप महत्त्वाचा असतो. नात्यात सुसंवाद नसेल तर ते नाते, रिलेशनशिप फक्त नावाला असते.

एखादी वाईट घटना घडली म्हणजे संपूर्ण आयुष्यच वाईट नाही. आयुष्य अधिक सुंदर कसे करता येईल, नाते कसे फुलवता येईल हे मनोरंजक पद्धतीने सांगितलेली गोष्ट म्हणजे हा चित्रपट होय. हा चित्रपट प्रत्येकाला नात्याबद्दल नवीन विचार देईल. मुड्स.., या सायको थ्रिलरनंतर महेन्द्र बोरकर तरुणाईला समर्पित ‘बॉईज वर्सेस गर्ल्स’ हा नवीन चित्रपट घेऊन येणार आहेत. बॉईज वर्सेस गर्ल्स, ही धमाल कॉमेडी आणि फुल मनोरंजनाची मेजवानी असेल. आपल्याला वय विसरून प्रेमात पाडणारी गोष्ट असेल.

अ. भा. मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले म्हणाले की, कोरोना काळानंतर आता नवनवीन चित्रपट तयार व्हावेत, निर्मात्यांनी पुढे यावे आणि चित्रपटसृष्टीचे काम पुन्हा जोमावे सुरू व्हावे अशी आमची इच्छा आहे. चित्रपट महामंडळ सर्व चित्रपट निर्मात्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील.

Continue reading

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...

१ ऑगस्टपासून मंत्रालयाचा प्रवेश होणार पूर्णपणे डिजिटल!

येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतल्या मंत्रालयातला अभ्यागतांचा प्रवेश पूर्णपणे डिजिटल होणार आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्णपणे डिजिटल होईल. १ ऑगस्टपासून, कागदावर आधारित सर्व प्रकारचे पास टप्प्याटप्प्याने बंद केले जातील आणि डिजिटली ओळख पटवून अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाईल. राज्याच्या डिजिटल...

हॉलिवूड नगरीत मराठी तारे-तारकांचे जल्लोषात स्वागत!

'नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म असोसिएशन' (नाफा)च्या मराठी चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनासाठी अवघे काही तास उरले असून, महाराष्ट्रातून हॉलिवूड नगरीत दाखल झालेल्या निमंत्रित कलाकारांचे सॅन होजे येथे जल्लोषात स्वागत झाले. २४ जुलैच्या रात्री 'नाफा'चे संस्थापक-अध्यक्ष अभिजीत घोलप यांच्या सिलिकॉन व्हॅली येथील...
Skip to content