Homeमुंबई स्पेशलमुंबईची हवा सातत्याने...

मुंबईची हवा सातत्याने सुधारतेय!

बृहन्मुंबई महानगरपालिकेने हाती घेलेल्या खोलवर स्वच्छता मोहिमेमुळे वायू गुणवत्ता निर्देशांक आता सातत्याने १००च्या खाली नोंदविला जात आहे. काही भागांमध्ये हा निर्देशांक जवळपास ७०पर्यंत नोंदविण्यात आला आहे. खोलवर स्वच्छता मोहिमेत रस्ते स्वच्छ धुतल्याने हवेतील धूलीकण कमी होऊन वायू गुणवत्ता सुधारल्याचे समोर आले आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रात डिसेंबर २०२३पासून खोलवर स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. सलग १८ आठवड्यांपासून पालिका क्षेत्रात सुरू असलेल्या या मोहिमेमुळे मुंबईतील हवेचे प्रदूषण कमी झाले आहे. मुंबईतील वायू प्रदूषण कमी करण्याच्या प्रमुख हेतूने ही मोहीम सातत्याने राबवली जात आहे. या मोहिमेचे देशभरात कौतुक करण्यात येत आहे. मुंबईतील वायूप्रदूषण लक्षणीयरित्या कमी झाले असून, नागरिकांनीदेखील समाधान व्यक्त केले आहे.

मुंबई

मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे. याठिकाणी सतत पर्यटकांचा राबता असतो. त्यामुळे या महानगराची प्रतिमा जागतिक पातळीवरही स्वच्छ राहावी यासाठी पालिका सतत प्रयत्नशील असते. मुंबईत स्वच्छतेची जबाबदारी असणाऱ्या स्वच्छता कामगारांच्या माध्यमातूनच मुंबई नगरी स्वच्छ आणि नीटनेटकी ठेवण्यासाठी निरनिराळे प्रयत्न सुरू असतात. त्याचाच एक भाग म्हणून खोलवर स्वच्छता मोहिमेअंतर्गत प्रत्येक विभागातून एका निवडणूक प्रभागात विभागातील सर्व यंत्रणा एकवटून गत चार महिन्यांपासून स्वच्छता मोहीम राबवित आहेत. या प्रकारच्या व्यवस्थेमुळे काही विभागात महिन्यातून एकदा, तर काही विभागात दोन महिन्यातून एकदा खोलवर स्वच्छता राबवली जात आहे. परिणामी, सार्वजनिक स्वच्छतेचा स्तर आणखी उंचावला आहे.  

ही खोलवर स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी पालिकेतर्फे ६१ मुद्दे असलेली प्रमाणित कार्यपद्धती तयार करण्यात आली आहे. या कार्यपद्धतीचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. नुकतीच ३० मार्च २०२४ रोजी पालिकेच्या सर्व विभागात सखोल स्वच्छता मोहीम राबविली गेली. या मोहिमेत १४७७ कर्मचाऱ्यांनी भाग घेतला. पालिकेच्या वेगवेगळ्या संयंत्रांचाही वापर करण्यात आला. सुमारे ५५६ किलोमीटर इतक्या लांबीचे रस्ते धुऊन स्वच्छ करण्यात आले. या दरम्यान ७० मेट्रिक टन कचऱ्याचे संकलन झाले तर, १.५९ टन इतकी माती उचलण्यात आली. तसेच १०६.४ मेट्रिक टन राडारोडा उचलण्यात आला. यापुढेही ही मोहीम सतत सुरू राहणार आहे. 

Continue reading

विलेपार्ल्यात साकारतोय मुंबईतील पहिला शहरी शेतीप्रकल्प

मुंबईतल्या विलेपार्ले विधानसभा क्षेत्राचे भाजपा आमदार पराग अळवणी यांच्या संकल्पनेतून मुंबईतील पहिल्या शहरी शेती प्रकल्पाचे उद्घाटन महापौर रितू तावडे यांच्या उपस्थितीत होणार असून उपमहापौर संजय घडी आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे तसेच महापालिकेतील विविध समिती अध्यक्ष व अधिकारी यावेळी...

नारीवंदन राहिले! सीमांकन जिंकले!! मोदी आणि गांधी आता मैदानात आमनेसामने!!!

महिलांना लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत ३३ टक्के आरक्षण देणारे त्याचप्रमाणे यादृष्टीने मतदारसंघाची पुनरर्चना (सीमांकन) करणारी घटनादुरूस्ती विरोधकांच्या प्रबळ एकजुटीमुळे आज संध्याकाळी फेटाळली गेली. याकरीता झालेल्या मतदानात घटनादुरूस्तीसाठी लागणारे दोनतृतियांश बहुमत मिळवण्यात सरकार अपयशी ठरले. लोकसभेत उपस्थित असलेल्या एकूण ५२८...

युद्धविरामापर्यंत होर्मूझ पूर्णपणे खुले, इराणकडून घोषणा!

जगाच्या तेलवाहतूक तसेच इतर व्यापारात महत्त्वाची भूमिका बजावणारी होर्मूझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करण्याची घोषणा इराण सरकारने केली आहे. इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अरागची यांनी नुकतीच ही घोषणा केली. लेबनान आणि इस्त्रायलमध्ये झालेल्या युद्धविरामानंतर इराण सरकारने हा निर्णय घेतल्याचे...
Skip to content