Homeडेली पल्ससोलापूरमध्ये मजुरांसाठीच्या १५...

सोलापूरमध्ये मजुरांसाठीच्या १५ हजार घरांचे पंतप्रधान आज करणार लोकार्पण

सोलापूर जिल्ह्यातील रे नगर, कुंभारी येथील असंघटित क्षेत्रातील लाभार्थ्यांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ३० हजार घरकुलांचा प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील १५,०२४ घरांचे लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

हा गृह प्रकल्प देशातील सर्वात मोठा गृहप्रकल्प असून असंघटित क्षेत्रातील 30 हजार कामगारांच्या घरकुलाच स्वप्न यामुळे साकार होत आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते 9 जानेवारी 2019 रोजी झाले होते.

गृहप्रकल्पाविषयी थोडक्यात माहिती

देशातील पहिलाच असंघटित कामगारांसाठीचा गृहप्रकल्प आहे. हा प्रकल्प ३६५ एकर जागेवर असून प्रकल्पामध्ये एकूण ८३३ इमारती आहेत. प्रत्येक इमारतीत ३६ घरे आहेत. कचरा उचलणारे, विडी कामगार, बांधकाम कामगार, वस्त्रोद्योग कामगार इत्यादी असंघटित क्षेत्रातील लाभार्थ्यांसाठी ही घरकुले आहेत.

केंद्र व राज्य शासनाच्या अनुदानाव्यतिरिक्त पायाभूत सुविधा व बीज भांडवलाकरिता राज्य शासनाने अर्थसाहाय्य दिले आहे. पाणीपुरवठा, वीजपुरवठा, सांडपाणी व्यवस्था यांसारख्या मूलभूत सुविधांबरोबरच सोलार व डिजिटल पत्ता या सुविधाही पुरविण्यात आल्या आहेत. या प्रकल्पामध्ये उजनी जलाशयातून पाणी पुरवठा, मलशुद्धीकरण केंद्र (STP) स्वतंत्र घनकचरा व्यवस्थापन यंत्रणा, शाळा, अंगणवाडी, खेळाचे मैदान, रुग्णालय, कौशल्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, रुफटॉप सोलर योजना, रेन वॉटर हार्वेस्टिंग या सुविधा आहेत.

Continue reading

मतदारांच्या तक्रार निवारणासाठी फोन करा- हेल्पलाईन नंबर 1950

निवडणुकीशी संबंधित सर्व शंका/तक्रारींच्या निराकरणासाठीकेंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतीच "1950" हेल्पलाईन क्रमांकासह देशभरामध्‍ये जिल्हास्तरावर ‘बुक-अ-कॉल विथ बीएलओ’ सुविधा सुरू केली आहे. याबाबतची संक्षिप्त माहिती खालीलप्रमाणे- नागरिकांच्या सर्व शंका/तक्रारींचे निराकरण करण्याच्या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने राष्ट्रीय मतदार हेल्पलाईन आणि सर्व 36 राज्ये आणि...

युद्धातल्या हस्तक्षेपाचा ट्रम्पचा पुन्हा दावा! भारताकडून खंडन!!

‘मी मोदींना ठणकावले.. युद्ध थांबवा नाहीतर 250% शुल्क लादेन!’ असा दम भरून आपण भारत-पाक युद्ध थांबवल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्चाहा एकदा केला आहे. दक्षिण कोरियातील ‘एशिया-पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन’ (APEC)च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या शिखर परिषदेत भाषण देताना...

गोव्यात शुक्रवारपासून रंगणार आशियाई अजिंक्यपद अ‍ॅक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक्स

१४वी अ‍ॅक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक्स आशियाई अजिंक्यपद स्पर्धा येत्या ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबरदरम्यान गोव्यात रंगणार आहे. ही प्रतिष्ठित स्पर्धा जिम्नॅस्टिक्स फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या आयोजनाखाली होणार असून या स्पर्धेत आशियातील अग्रगण्य जिम्नॅस्ट आपली कौशल्ये, नियंत्रण आणि कलात्मकता दाखवणार आहेत. स्पर्धैत...
Skip to content