Homeकल्चर +उद्या आनंद घ्या...

उद्या आनंद घ्या नुपूर गाडगीळ यांच्या शास्त्रीय संगीताचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे उद्या, रविवार दि. १४ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी पाच वाजता नुपूर गाडगीळ यांच्या शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम केंद्राच्या गोखले सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. यावेळी त्यांना तबल्याची साथ करतील कौस्तुभ दिवेकर आणि संवादिनीची साथ अनिरुद्ध गोसावी करणार आहेत. हा कार्यक्रम कै. य. वि. आणि कै. सुधाताई भातखंडे यांच्या सहाय्याने आयोजित केला असून केंद्रातर्फे सर्व रसिकांनी याचा आनंद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

नुपूर गाडगीळ ग्वाल्हेर-आग्रा-जयपूर घराण्याच्या गायिका असून त्या गेली २० वर्षे पं. मधुकर गजाननराव जोशी यांच्याकडे संगीताचं शिक्षण घेत आहेत. त्या हिंदुस्थानी कंठ संगीतात एसएनडीटी विद्यापीठातून पदव्युत्तर स्नातक असून अ. भा. गांधर्व महाविद्यालयातून त्यांनी संगीत अलंकार ही पदवी विशेष प्राविण्यासह प्राप्त केली आहे. त्यांनी नाट्यसंगीताचे मार्गदर्शन शुभदा आणि श्रीकांत दादरकर तसेच रामदास कामत, अरविंद पिळगावकर, रजनी जोशी यांच्याकडून घेतलं आहे. त्यांना ठाणे भूषण पं. राम मराठे पुरस्कार, पं. रामकृष्णबुवा वझे पुरस्कार, युवा चैतन्य पुरस्कार असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. 

Continue reading

मोहिते चषक कॅरम स्पर्धेत सार्थक केरकर अजिंक्य

आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे राष्ट्रीय मिल मजदूर संघ सहकार्याने झालेल्या अमृत महोत्सवी गोविंदराव मोहिते चषक विनाशुल्क राज्यस्तरीय शालेय कॅरम स्पर्धेत पार्ले टिळक विद्यालयाचा सार्थक केरकर अजिंक्य ठरला. चुरशीच्या अंतिम सामन्यामध्ये सार्थक केरकरने अचूक खेळासह राणीवर सतत कब्जा मिळवित राष्ट्रीय ख्यातीची...

मनाला गुंतवून ठेवणारं कोवळं प्रेमगीत ‘झोका’ प्रदर्शित

प्रेम कधी शब्दांत नाही मावत, ते डोळ्यांत दिसतं, हसण्यात मिसळतं आणि शांततेत गुंजतं. दोन मनं एकत्र येत असताना त्यांच्यातली नाजूकशी चाल, हेच त्या प्रेमाचं खरं संगीत असतं. याच भावनेला स्वरबद्ध करत शशिकांत धोत्रे निर्मित आणि दिग्दर्शित 'सजना' चित्रपटाचं एक...

किया कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस ११.४९ लाखांत लॉन्च

 किया इंडिया या मास-प्रीमियम ऑटोमेकरने ग्राहकांसाठी त्‍यांची बिग, बोल्‍ड फॅमिली वेईकल नवीन किया कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस ११.४९ लाख रूपयांच्‍या आकर्षक सुरूवातीच्‍या किंमतीमध्‍ये लाँच केली आहे. आधुनिक, मोठ्या कुटुंबांसाठी डिझाइन करण्‍यात आलेली ही प्रीमियम वेईकल एमपीव्‍ही व एसयूव्‍हीमधील तफावत दूर करते....
Skip to content