Homeहेल्थ इज वेल्थआता वापरा विषाणूरोधक...

आता वापरा विषाणूरोधक थ्रीडी मास्क!

कोरोना काळात मास्कच्या नवनवीन प्रकाराने सर्वसामान्यांना अनेक ऑप्शन्स दिले. त्यातच आता विषाणूंना रोखणारा आणि थ्रीडी प्रिटिंगने आकर्षित केलेले मास्क जनतेला भुलवणार आहेत.

थ्रीडी प्रिंटिंग आणि फार्मास्युटिकल्सच्या एकत्रिकरणातून हा नवीन प्रकारचा मास्क तयार झाला आहे. पुण्यातल्या थिंकर टेक्नोलॉजीज इंडिया प्रा. लि. या स्टार्ट अप कंपनीने विकसित केलेल्या या मास्कना बाहेरून विरुसाईड्स, या विषाणूरोधक घटकांचे कोटिंग आहे. व्हायरुसीडल मास्क प्रकल्प हा केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाची वैधानिक संस्था असलेल्या तंत्रज्ञान विकास मंडळाकडून व्यावसायिकरणासाठी आर्थिक सहाय्य मिळालेल्या आणि कोविड विरोधातील लढाईतील सुरुवातीच्या प्रकल्पापैकी एक आहे.

कोविड विरोधातील लढाईत नवनवीन उपाय शोधण्याच्या प्रक्रियेत या प्रकल्पाला मे 2020मध्ये तंत्रज्ञान विकास मंळाकडून अर्थसहाय्य देण्यात आले. 8 जुलै, 2020 रोजी करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. हे किफायतशीर आणि अधिक कार्यक्षम मास्क कोविड-19चा प्रसार रोखण्यात सामान्य एन-95, 3-प्लाय आणि कापडी मास्कचा तुलनेत अधिक प्रभावी आहेत असा दावा 2016मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीने केला आहे.

उच्च दर्जाच्या अधिक प्रभावी मास्कच्या गरजेवर शोधला उपाय

थिंकर टेक्नोलॉजीज इंडिया ही कंपनी नवीन फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन्स आणि विविध औषधांचे ड्रग्स-लोडेड फिलामेंट्स शोधण्यासाठी फ्यूजड डिपोझिशन मॉडेलिंग (एफडीएम) थ्रीडी- प्रिंटर्स विकसित करण्याचे काम करते. संस्थापक संचालक डॉ. शीतलकुमार झांबड म्हणाले की, आम्ही महामारीच्या प्रारंभीच्या काळात या समस्येचा आणि त्यावरील संभाव्य उपायावर विचार करण्यास सुरूवात केली. तेव्हा लक्षात आले की, संसर्ग रोखण्यासाठी फेस मास्क सर्वात महत्त्वाचे साधन म्हणून सर्वत्र वापरला जाईल. त्यावेळी बहुतेक मास्क घरगुती, कापडी आणि तुलनेने कमी गुणवत्तेचे होते असे आम्हाला आढळले. उच्च-दर्जाच्या मास्कच्या  आवश्यकतेमुळेच आम्ही संसर्ग रोखण्यासाठी किफायतशीर आणि अधिक प्रभावी व्हायरसीडल कोटेड मास्क विकसित करण्याचा प्रकल्प हाती घेतला.

मास्क निर्मितीचा प्रवास

याच उद्देशाने थिंकर टेक्नोलॉजीजने विषाणूरोधक कोटिंग फॉर्म्युलेशन विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले. नेरूळमधल्या मर्क लाइफ सायन्सेसच्या सहकार्याने थिंकर  टेक्नोलॉजीजद्वारे ते विकसित केले गेले आणि यासाठी मर्क लाईफच्या संशोधन सुविधेचा वापर करण्यात आला. कोटिंग फॉर्म्युलेशनचा उपयोग फॅब्रिक थर कोटिंग करण्यासाठी केला आणि थ्रीडी प्रिंटिंग तत्त्व एकसंघपणा येण्यासाठी वापरले गेले.

एन-95, 3-प्लाय, साध्या कपड्यांचे मास्क, थ्रीडी प्रिंटेड किंवा इतर प्लास्टिक कव्हर मास्कमध्ये हा कोटेड लेयर पुन्हा वापरण्यायोग्य फिल्टरसह अतिरिक्त लेयर म्हणून समाविष्ट केला जाऊ शकतो. या पुन्हा वापरण्यायोग्य मास्कचे फिल्टरदेखील थ्रीडी प्रिंटिंग वापरुन विकसित केले आहे.

सार्स-सीओव्ही-2 विषाणू निष्क्रिय करण्यासाठी कोटिंगची चाचणी केली गेली आहे. कोटिंगसाठी वापरलेले साहित्य सोडियम ऑलेफिन सल्फोनेट आधारित मिश्रण आहे. साबण बनवण्यासाठी लागणारा हा घटक आहे ज्यात हायड्रोफिलिक आणि हायड्रोफोबिक गुणधर्म आहेत. विषाणूच्या संपर्कात आल्यावर तो विषाणूचा बाह्य पडदा विस्कळीत करतो. यात  वापरलेली सामग्री साधारण तापमानात स्थिर आहे आणि सौंदर्यप्रसाधनांमध्ये ती मोठ्या प्रमाणात वापरली जाते.

हे मास्क फिल्ट्रेशनपेक्षा अधिक संरक्षण प्रदान करतात. या मास्कमध्ये जीवाणू फिल्ट्रेशन कार्यक्षमता 95%पेक्षा जास्त आहे. या प्रकल्पात प्रथमच आम्ही थ्रीडी प्रिंन्टर्सचा वापर केला आहे, ज्यामुळे प्लास्टिक-मोल्डेड किंवा थ्रीडी-प्रिंटेड मास्क कव्हरवर मल्टीलेयर कापड फिल्टर  तंतोतंत बसतील. थिंकर टेक्नोलॉजीजने या उत्पादनाच्या पेटंटसाठी अर्ज केला आहे, असे डॉ. झांबड यांनी सांगितले.

Continue reading

एलिमेंट्स आर्ट क्लासेसचे अप्रतिम प्रदर्शन

एलिमेंट्स आर्ट क्लासेस च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्याच्या कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण आर्ट गॅलरी येथे पंचतत्व या तीन दिवसांचे वार्षिक कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सहा ते १८ वर्षे वयोगटातल्या जवळजवळ ४५ विद्यार्थ्यांच्या सुमारे ९० कलाकृती या प्रदर्शनात...

अकरावी प्रवेशासाठी नंतर सादर करा गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला

राज्यातल्या इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेत सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची अट शिथिल केली आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर...

सौरभ विजय यांनी दिला डिजिटल नवोपक्रमावर भर

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (UIDAI) मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ विजय यांनी मुंबईतील युआयडीएआय प्रादेशिक कार्यालयाला नुकतीच भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच प्रादेशिक दौरा आहे. युआयडीएआय प्रादेशिक कार्यालय,...
Skip to content